अशोक खरातसोबतच्या फोटोवरून अंजली दमानिया भडकल्या
“माझ्याबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या,” ED चौकशीनंतर रुपाली चाकणकरांचे मोठे वक्तव्य
आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून अशोक खरात समवेत रुपाली चाकणकर आणि कुटुंबीयांचा वादग्रस्त फोटो पोस्ट करत अंजली दमानिया म्हणाल्या, “काल ह्या फोटोवर, आणि गुवाहाटी वर रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रश्न असा की हा फोटो माध्यमांकडे अचानक कुठून आला, का मुद्दाम दिला (पेरला) गेला, हे गूढ परमेश्वराला माहीत. त्यांचे म्हणणे आहे की त्या परिवारासकट गुवाहाटी ला गेल्या होत्या. पण ज्या माध्यमाने ती बातमी चालवली त्यांनी फक्त तीनच नावांची उल्लेख केला आहे. रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात.
१) २८ ऑगस्ट २०२१ ला खरोखर ३ माणस गेली होती की १२ माणसे गेली होती ह्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. एक महत्वाची बाब म्हणजे, ह्या तारखेनंतर दोन महिन्यात, त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या.
२) बरं, त्या माध्यमाच्या बातमी मधे आणि एक तारीख होती, ती म्हणजे ३०/०६/२०२३. ३० जूनला रुपाली चाकणकर ह्या पुन्हा गुवाहाटी ला गेल्या होत्या. दोन दिवस राहिल्या, आणि २ जुलै ला परत आल्या. ह्याच तारखेला अजित पवार यांनी पक्ष फोडला आणि २ जुलै ला त्यांचा उप मुख्यमंत्री म्हणून शपथ विधी झाला.
३) तिसरी गोष्ट, हा फोटो रॅडिसन ब्लूचा, गुवाहाटीचा नाही असे आत्तातरी वाटते.
मी ही माहिती SIT ला पाठवली आहे आणि त्यांना विनंती की त्यांनी ह्याचा तपास करावा.”
काल ह्या फोटोवर, आणि गुवाहाटी वर रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रश्न असा की हा फोटो माध्यमांकडे अचानक कुठून आला, का मुद्दाम दिला (पेरला) गेला, हे गूढ परमेश्वराला माहीत. त्यांचे म्हणणे आहे की त्या परिवारासकट गुवाहाटी ला गेल्या होत्या. पण ज्या माध्यमाने ती बातमी चालवली… pic.twitter.com/AXxVq0P2jF — Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 15, 2026
नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची १४ मे रोजी ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. अशोक खरात सोबत केलेल्या गुवाहाटी दौऱ्याबद्दल तसेच त्याचासोबत कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “माझ्याबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या. अनेक बातम्यांचा विपर्यास केला गेला. खरातसोबत आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता. ईडीच्या चौकशीत मी सगळी उत्तर दिली आहेत,” असे त्या म्हणाल्या. ईडी चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “जेव्हा जेव्हा चौकशीला बोलावलं आहे तेव्हा हजर राहिलो आहे. माझ्याबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या. अनेक बातम्यांचा विपर्यास केला गेला. खरातसोबत आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता. ईडीच्या चौकशीत मी सगळी उत्तर दिली आहेत. नोटीस मिळण्याआधी तीन दिवसांपूर्वी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो. तपासात आम्ही योग्य ते सहकार्य वेळोवेळी केलं आहे. चार साडेचार तास चौकशी झाली. यामध्ये जबाब नोंदवणं, लिहून घेणं, मधला लाँच ब्रेक अश्या बराचसा वेळ होता. मी पहिल्या दिवशी जे सांगितलं ते आजही सांगते खरातशी आमचा कोणताही आर्थिक संबंध नव्हता. कोणत्याही जमिनीत आम्ही पार्टनर नव्हतो. त्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवत नाहीत,” असे त्या म्हणाल्या.
Breaking News: Devendra Fadnavis यांची साताऱ्यात मोठी घोषणा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा






