
सरकारला अधिवेशनात समोर जाण्याची इच्छा दिसत नाही
मुंबई : सरकारला अधिवेशनात समोर जाण्याची इच्छा दिसत नाही. घाबरलेल्या मनस्थितीत आहे. घोटाळे राज्यात सुरू आहेत. गुंडांची दादागिरी वाढली. शेतकरी आत्महत्या होत आहेत. आमदार मारण्याची भाषा करत आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती बघता जास्त वेळ अधिवेशन घेण्याची इच्छा नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार हे विरोधात असताना अधिवेशनासंदर्भात भूमिका मांडत होते. अधिवेशन जायचं होतं तर बजेट अधिवेशन नागपुरात घ्या? तोंडाला पान पुसण्यासाठी हे अधिवेशन घ्यायचं. आचारसंहितेचं कारण सांगून घोषणा करणार नाही. विदर्भातील यंत्रणा कामाला लावून पाच-सहा दिवसांसाठी मुंबई हलवून नागपूरात आणायची आणि यातून काहीही निष्पन्न होणार नाही. सरकारने बजेट अधिवेशन घेतलं तर न्याय मिळाला असता…आता नाही तर पुढे विचार करावा. आम्ही अधिवेशनाच्या बैठकीत विषय मांडू.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: महाराष्ट्रात महायुतीतील दुरावा वाढला? BJP ने पुन्हा एकनाथ शिंदेंकडे केला काणाडोळा, इशाराही टाळला
तसेच ईव्हीएमसंदर्भात तुमची भूमिका स्वच्छ आहे. 20 दिवस थांबायची वेळ का आहे. 268 पैकी 175 जागा भाजपच्या येथील हे कशाच्या आधारावर बोलतात? कोणते दिवे लावले इतक्या जागा येईल? महायुतीत एकमेकांची नामुष्की केली जाईल. लाडक्या बहिणचा नावाचा वापर करून लाडक्या बहिणीच्या नावाने निवडून आले. EVM मध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याच्या प्रयत्न आहे. जर भाजपच्या 175 जागा आल्या तर भाजपने बेईमानी करून हॅक करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
ईव्हीएम हॅक बाहेरूनच करणार ही पळवाट
ईव्हीएम हॅक बाहेरूनच करणार ही पळवाट आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतात 20 हजार एका मताला दिले, कामठीत आरोप केले. उमेदवार फार्म हाऊसमधील घटना आहे. मत मिळत नसल्याने निवडणुका लांबणीवर टाकल्यात. सरकारने बाजू मांडली नाही, त्यांना कारण घोळ करायचा आहे.
पार्थ पवारांवर कारवाई व्हायला पाहिजे
पार्थ पवारांवर कारवाई व्हायला पाहिजे, तिजोरी फोडणारा आरोपी मात्र निधी गायब करणारा दोषी नाही. हे कसं होऊ शकते…ती तिजोरी फोडण्यासाठी शस्त्र देण्याचे काम कोणी केलं? कितीही दाबलं तरी पार्थ पवारांवर होणारी कारवाई रोखली जाऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : Devendra Fadnavis meets Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट; 15 मिनिटे चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चंना उधाण