Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘निवडणूक आयोग सरकारच्या हातातली कठपुतली’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांची टीका

राहुल गांधी यांनी पुरावे सादर करूनही निवडणूक आयोग जागा होत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की, झोपी गेलेल्याला जागे करणे सोपे आहे, पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला जागे करणे अवघड आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 06, 2025 | 07:44 AM
'निवडणूक आयोग सरकारच्या हातातली कठपुतली'; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांची टीका

'निवडणूक आयोग सरकारच्या हातातली कठपुतली'; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांची टीका

Follow Us
Follow Us:

मुंबई : भाजप निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सरकारच चोरत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एक बॉम्ब टाकून भाजप व निवडणूक आयोग लोकशाहीचा खून कसा करत आहेत, हे देशाला दाखवून दिले. हरियाणात मतचोरी कशी केली याचे पुरावे देऊन निवडणूक आयोगाला उघडे पाडले. पण ‘निर्लज्जम सदा सुखी’ या उक्तीप्रमाणे निवडणूक आयोगाच्या कामात काहीच सुधारणा होत नाही. निवडणूक आयोग सरकारच्या हातातली कठपुतली बनले आहे, असे आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध मुद्यांवर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “राहुल गांधी यांनी पुरावे सादर करूनही निवडणूक आयोग जागा होत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की, झोपी गेलेल्याला जागे करणे सोपे आहे, पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला जागे करणे अवघड आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हरियाणा पॅटर्न वापरून भाजपने चोरीचे सरकार बनवले”.

दरम्यान, महाराष्ट्रात अवघ्या सहा महिन्यात ४७ लाख मतदार वाढले तर मतदानानंतर रात्रीच्या अंधारात जवळपास ८ टक्के मतदान वाढल्याचे दाखवले. आता त्याच सदोष मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी वापरल्या जात आहेत”, असेही सपकाळ म्हणाले.

निवडणूक आयोग उदासीन

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दुबार मतदारांची नावे यादीतून वगळण्याबाबत निवडणूक आयोग उदासीन असल्याचा आरोप केला आहे. आयोगाने ही कृती तात्काळ करावी, असे सांगत त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात हजारो नावे दुबार असल्याचे निदर्शनास आणून दिले.

सपकाळांवर पोलिसांची पाळत?

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. सपकाळ वास्तव्याला असलेल्या नाना चौकातील सर्वोदय आश्रमात पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवून असल्याचा आरोप केला जातोय. यावरुन हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाच्या आदेशाने आमच्यावर पाळत ठेवली जात आहे? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

हेदेखील वाचा : Bihar Election Voting Day 2025 : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार रिंगणात

Web Title: Congress state president harshvardhan sapkal criticized on bjp and government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 07:44 AM

Topics:  

  • Harshvardhan Sapkal
  • political news

संबंधित बातम्या

‘राम मंदिरातील देणग्यांवर दरोडा’; मोदी, RSS आणि ट्रस्टवर हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप, निष्पक्ष चौकशीची मागणी
1

‘राम मंदिरातील देणग्यांवर दरोडा’; मोदी, RSS आणि ट्रस्टवर हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप, निष्पक्ष चौकशीची मागणी

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, देशासमोरचा धोका लक्षात घेऊन संघर्षाची तयारी ठेवा; सपकाळांचे आवाहन
2

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, देशासमोरचा धोका लक्षात घेऊन संघर्षाची तयारी ठेवा; सपकाळांचे आवाहन

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन्…’
3

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन्…’

‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’, खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी
4

‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’, खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.