Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagarpanchayat Election Result 2025 : राज्यात एक नंबर भाजपच! कॉंग्रेसच्या वडेट्टीवारांची कबुली, चर्चांना उधाण

Election Result 2025 : कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देत कॉंग्रेस पक्ष विजयश्री खेचून आणणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 21, 2025 | 10:36 AM
Congress Vijay Wadettiwar Press Conference on Nagar parishad Election Result 2025

Congress Vijay Wadettiwar Press Conference on Nagar parishad Election Result 2025

Follow Us
Close
Follow Us:

Nagarpanchayat Election Result 2025 : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाची उत्सुकता निर्माण झाली आहे. आज (दि.21) नगर पंचायत आणि नगर परिषदांचे निकाल हाती येणार आहे. 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी पार पडत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार ही मतमोजणी प्रक्रिया राज्यभर एकाच दिवशी राबवली जात आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यानंतर आता निकाल हाती येत असून सर्वच राजकीय पक्षांना विजयाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॉंग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देत कॉंग्रेस पक्ष विजयश्री खेचून आणणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, “निकाल थोड्या वेळात येणार आणि मी असं म्हणणार नाही की काँग्रेस पार्टी नंबर एक वर राहील पण तुम्ही सगळे या निकालानंतर चकित व्हाल. काँग्रेसला या राज्यात क्रमांक दोन वर आपण सगळे पाहू शकाल. ग्रामीण भागातील जनता आश्चर्यचकित करणारे निकाल देतील, मेट्रो शहराविषयी आम्ही फार बोलू शकत नाही,” असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी; आघाडी तुटली, काँग्रेस आता स्वबळावर

पुढे ते म्हणाले की, “विदर्भातील सर्वाधिक नगरपरिषदा या काँग्रेसच्या ताब्यात दिसतील, महाराष्ट्रात प्रचंड पैशाचा पूर आणला गेला सत्तेचा दुरुपयोग केला गेला. त्यामुळे भाजप निवडणूक आयोगाच्या सहकार्याने एक क्रमांकावर राहील. आम्ही जनतेच्या सहकार्याने कुठलेही बळ नसताना काँग्रेस पक्ष स्वबळावर क्रमांक दोन पर्यंत पोहोचेल याचाच अर्थ जनतेच्या मनात काँग्रेस आहे आणि राहील,” असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. मात्र भाजप पक्ष हा राज्यामध्ये मोठा असल्याचे देखील वडेट्टीवार यांनी मान्य केले आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “राज्यामध्ये एक नंबर वर भाजपच राहील. मात्र हे नक्की निकाल आल्यानंतर समजेल. 246 नगरपरिषद आहेत 246 नगरपरिषदांमध्ये काँग्रेस राज्यात क्रमांक दोनवर राहील एवढा मी खात्रीने सांगतो,” असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा : ‘पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणे गुन्हा…’, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले की, “शिंदे शिवसेना तिसरा नंबर वर जाईल, सत्तेच्या विरुद्ध लढताना संपूर्ण राज्यात आमचे 16 आमदार आहेत फक्त. सोळा आमदाराच्या बळावर आम्ही क्रमांक दोन वर पोहोचतो आहे म्हणजे जनतेच्या मनातील महिलांच्या बेरोजगारांच्या तरुणांच्या मनातील तो उद्रेक असा त्याचा अर्थ निघेल आणि त्यापासून सत्ताधारी धडा घेतील अशी मी आगाऊ सूचना देतो. विदर्भात चांगला परफॉर्मन्स करू आणि विदर्भात किमान 30 ते 32 नगरपरिषदा या काँग्रेसच्या ताब्यात तुम्हाला दिसते. ऍक्टिव्ह मोड वगैरे काही नसतं, सत्ता पावर त्यांच्याकडे त्यामुळे ते ऍक्टिव्ह मोडवर दिसतात,” असा टोला देखील विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

Web Title: Congress vijay wadettiwar press conference on nagar parishad election result 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Local Body Election
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

Maharashtra Local Body Election Result 2025: आज ठरणार ‘नगरां’चे शिलेदार ! मतमोजणीकडे नजरा, राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे
1

Maharashtra Local Body Election Result 2025: आज ठरणार ‘नगरां’चे शिलेदार ! मतमोजणीकडे नजरा, राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे

Maharashtra Local Body Election 2025 : निवडणुकीची मतमोजणी आज होणार; राज्यातील जनतेचे लागले लक्ष
2

Maharashtra Local Body Election 2025 : निवडणुकीची मतमोजणी आज होणार; राज्यातील जनतेचे लागले लक्ष

Maharashtra Local Body Election Result 2025 Live: राज्यातील 288 नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार?
3

Maharashtra Local Body Election Result 2025 Live: राज्यातील 288 नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार?

Mangalwedha Voting: मंगळवेढा नगरपरिषदेसाठी 69.77 टक्के मतदान, किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली प्रक्रिया
4

Mangalwedha Voting: मंगळवेढा नगरपरिषदेसाठी 69.77 टक्के मतदान, किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.