Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपचा प्लॅन यशस्वी होणार? महापौरपदासाठी भाजपला राष्ट्रवादीची साथ; पण उपमहापौरपदासाठी आता…

अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. त्याआधीच राजकीय समीकरणे रंगतदार वळणावर पोहोचली आहेत. महापौरपदासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 05, 2026 | 08:03 AM
भाजपचा 'प्लॅन' यशस्वी ?

भाजपचा 'प्लॅन' यशस्वी ?

Follow Us
Follow Us:

अमरावती : महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या अगदी पूर्वसंध्येला राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजप, युवा स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय खेळीमुळे उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अनिश्चितता निर्माण झाली आहे. भाजपचा महापौरपदावरील विजय मात्र जवळपास निश्चित मानला जात आहे.

अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. त्याआधीच राजकीय समीकरणे रंगतदार वळणावर पोहोचली आहेत. महापौरपदासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. त्यांच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे भाजपचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे. मात्र, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत चित्र वेगळे दिसत आहे. भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाने सव्वा-सव्वा वर्षांच्या सूत्रावर सहमती दर्शवत महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. युवा स्वाभिमान पक्षाने उपमहापौरपदासाठी आपला उमेदवार घोषित केला आहे. भाजपकडूनही त्याला पाठिंबा अपेक्षित आहे.

हेदेखील वाचा : महिला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि युवा स्वाभिमान पक्ष हे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असल्याने, राष्ट्रवादी उपमहापौरपदासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देईल की नाही? याबाबत मोठी साशंकता आहे. राष्ट्रवादीने भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला असला, तरी उपमहापौरपदाबाबत त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. युवा स्वाभिमान पक्षालाही या राजकीय गणिताची पूर्ण जाणीव आहे.

भाजपचा सत्ता मिळवण्याचा मार्ग सुकर

भाजपने एका दगडात दोन शिकार मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महापौरपदाचा विजय निश्चित करून भाजपने सत्ता मिळवण्याचा मार्ग सुकर केला आहे. दुसरीकडे दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांना आमनेसामने उभे करून राजकीय डावपेच यशस्वीपणे खेळल्याचे मानले जात आहे. आता सर्वांचे लक्ष उपमहापौरपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित) ची भूमिका निवडणुकीचा निकाल निर्णायक ठरणार आहे.

हेदेखील वाचा : अपक्षांच्या मुसंडीमुळे घड्याळ, पंजा आणि मशालीचे तिन्ही प्रमुख उमेदवार हैराण, बेंबळी जिल्हा परिषद गटातील लढतीला चुरस

Web Title: Bjp has support of ncp for the mayor post in amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 08:03 AM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Sanjay Raut News: ‘मी याआधी ५ लोकांना ठार केलंय’;  संजय राऊतांचा आरोप कुणावर, थेट पोलीस आयुक्तांना लिहीले पत्र
1

Sanjay Raut News: ‘मी याआधी ५ लोकांना ठार केलंय’; संजय राऊतांचा आरोप कुणावर, थेट पोलीस आयुक्तांना लिहीले पत्र

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?
2

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?

MVA Meeting: ठाकरांचे ६ खासदार फुटल्याने खळबळ! महाविकास आघाडी कमालीची सावध; घेतली तातडीची मोठी बैठक
3

MVA Meeting: ठाकरांचे ६ खासदार फुटल्याने खळबळ! महाविकास आघाडी कमालीची सावध; घेतली तातडीची मोठी बैठक

‘…हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला
4

‘…हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.