
Congress Vijay Wadettiwar target election commission on delay in local body election result
विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निकाल पुढे ढकल्यावर नाराजी व्यक्त केली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्य निवडणूक आयोग, मला वाटतं की त्यांच्या अकलेची दिवाळे निघाले असे म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रात अनेक निवडणुका झाल्या मात्र एवढा गोंधळ आणि पोरखेळ कधीच झाला नव्हता, मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्रात हा निवडणुकीचा धिंगाणा दिसतोय त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाअंतर्गत त्यावेळी कोणाच्या दबावात घाईघाईत तारखा घोषित केल्या, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
हे देखील वाचा : देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांची खास भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पुढे ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की 50% च्या वर कुठले आरक्षण जाता कामा नये, असं असताना निवडणूक आयोगाने 50% च्या वर आरक्षणाच्या मर्यादा पाळल्या नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून निवडणुका घेत आहोत, या सगळ्या लोकांना वेठीस धरणे, सात- आठ वर्षानंतर निवडणुका होत आहेत आणि त्याही व्यवस्थित न करणे यासाठी राज्य निवडणूक आयोग सोबत राज्य सरकारही जबाबदार आहे. उद्या ईव्हीएम मध्ये छेडछाड झाली तर कोण जबाबदार? ईव्हीएम हॅक करता येतात, करा तुमच्या मनाप्रमाणे, निवडणुका घेताच कशाला? घोषणा करून टाका भाजपच्या लोकांना विजयी झाले म्हणून. आता अठरा दिवस जे मिळत आहेत यातून लोकांचा विश्वास कसा राहील, त्यामुळे या सर्व प्रक्रियेत निवडणूक आयोग आणि राज्य सरकारही दोषी आहे, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
हे देखील वाचा : राजकीय पक्षांपेक्षा कायदा महत्त्वाचा; टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!
पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले की, या दोघांच्या सरकारचे लोक नेते जे बोलत आहेत, सरकारच्या इशाऱ्यावर चालणारा निवडणूक आयोग झाला आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाचे ज्ञानेश्वर यांनी सांगितले आहे की जगात भारताच्या निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शीपणे होतात. हुकमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू झाली आहे हेच दिसतय. आता ओबीसींच्या जागा कमी होणार याला कोण जबाबदार आहे? 20 दिवसानंतर निवडणूक घ्या म्हटलं तेव्हा सरकारने विरोध का नाही केला? कारण त्यांनाही तेच पाहिजे असेल. त्यांना अपयश मिळत होता म्हणूनच या निवडणुका लांबणीवर टाकल्या, भाजपच्या अंतर्गत सर्वे मध्ये 175 जागा जिंकत असल्याचा सर्वे होता, त्यामुळे हे फिक्सिंग आहे आणि तो सर्व लोकांना मूर्ख बनवण्यासाठी दाखवण्यात आला, असा आरोप कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.