congress vijay wadettiwar target mahayuti over manikrao kokate contraversial statement
Manikrao Kokate Contraversial Statement : नागपूर : राज्याच्या राजकारणामध्ये सध्य माणिकराव कोकाटे यांचे नाव चर्चेमध्ये आले आहे. माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेच्या सभागृहामध्ये जंगली रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राज्यामध्ये शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती असताना आणि आत्महत्येचा प्रमाण वाढलेले असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रम्मी खेळत असल्यामुळे जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांनी शासनाबाबत वादग्रस्त विधान देखील केले. यावरुन आता कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्हिडिओ समोर आल्यानंतर देखील सभागृहामध्ये जंगली रम्मी खेळत नसल्याचे म्हणत सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र यावेळी त्यांनी शासनाबाबत वादग्रस्त विधान केले. माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी नाही तर शासन भिकारी आहे असे वक्तव्य केले. सत्ताधारी पक्षामध्ये असून आणि मंत्रिमंडळामध्ये असून माणिकराव कोकाटे यांनी केलेले वक्तव्यावरुन आता नाराजी व्यक्त केली जात आहे. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या सरकारला थोडी तरी लाज शरम आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, या सरकारला थोडी तरी लाज शरम आहे का? की त्यांनी विकून खाल्ली आहे. जो व्यक्ती शेतकऱ्याला भिकारी म्हणतो सभागृहात रमी खेळतो असे बेजबाबदार लोकं सरकारला आवडत असेल तर कारवाई करू नये. अन्यथा त्याच्यावर एक मिनिटही पदावर न ठेवता कारवाई करावी. शेतकऱ्यांसंदर्भात उदासीन सरकार आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या भावनांशी देणं घेणं नाही, असे वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्याला पाठीशी घालणार आहे का? रमी खेळणारा मंत्री कृषी मंत्री आहे असं आम्ही सांगू, असा आक्रमक पवित्रा विजय वडेट्टीवार यांनी घेतला आहे.
सर्वच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस
एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यांच्या निधीसाठी मुख्यमंत्र्यांची सही लागणार आहे. यावरुन टीका करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, आता सर्वच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहे. बैलगाडीचे मालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. ओढणाऱ्या दोघांपैकीं एक जण बारामतीकर आणि ठाणेकर आहे. त्यामुळे नागपूरकरांच वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सर्व अधिकार मुख्यमंत्री यांनी त्यांच्या हातात ठेवले आहे. या ठिकाणी बैलगाडीच्या बैलांचे दोर आहे. ते ओढण्याचं काम जोरात सुरू आहे, एवढा त्याचा अर्थ निघतो, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नाहीतर सुरज चव्हाणला अटक करावी
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी पत्ते उधळणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर त्यांचा राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. मात्र त्यांना एका रात्रीमध्ये पोलिसांकडून बेल मिळाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावरुन विजय वडेट्टीवार म्हणाले की, एवढ्या मोठ्या पद्धतीनं कार्यकर्त्याला मारलं. एखाद्या पोलिस छोट्या मोठ्या घटनेत लगेच उचलतात. मात्र यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच अशा गोष्टीला समर्थन आहे का? याचा खुलासा करावा नाहीतर सुरज चव्हाणला अटक करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.