
DCM Ajit Pawar and Dhavalsingh Mohite Patil meet Akluj Political News
Maharashtra Political News : अकलूज : महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील us राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. दोन्ही बाजूंनी सकारात्मक बोलणे झाले आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुतीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात घड्याळाची टिकटिक वाढण्याची जबाबदारी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आपल्या समर्थ खांद्यावर पेलणार असल्याचे दिसते आहे.
यापूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या काळात डॉ. धवलसिंह मोहिते पाटील कुटुंबीय भाजपच्या व्यासपीठावर दिसून आले. आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत धवल मोहिते पाटील हे भाजपाला साथ देतील असे वाटले होते. परंतु माळशिरस तालुक्याच्या राजकारणाने अचानक पलटी मारली आहे. अजित पवार यांची भेट झाल्यानंतर ते राष्ट्रवादीचे काम करणार असल्याचे बोलले जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अकलूज नगर परिषद निवडणूकीच्या हालचाली सध्या जोमात सुरु असताना डॉ. धवल मोहिते पाटील मात्र शांत होते. त्यांच्या शांततेमागील गूढ आत्ता उमगले आहे. धवल मोहिते पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल उभा करतील अशी दाट शक्यता वाटत आहे. जर असे झाले तर अकलूज नगर परिषदेची निवडणूक चूरशीची होण्याची शक्यता आहे. जर भाजपा आणि मित्र पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मनोमिलन झाले तर काही जागा अजित पवार गटाला सोडल्या जाऊन युती होण्याची चिन्हे आहेत.
एकंदरीत माळशिरस तालुक्याच्या राजकारणात रोज नव्या उलथा पालथी होत आहेत. अनेक लोक अनेक पक्षामध्ये दाखल होत असल्यामुळे कार्यकर्त्यांची भंबेरी उडू लागली आहे. आपण कोणता झेंडा हाती घ्यावा, कोणाचा जयजयकार करावा हेच कळेनासे झाले आहे. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे सहकुटुंब अजित पवारांच्या भेटीला गेले आहे. सोबत अतुल सरतापे देखील उपस्थित होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आरक्षण सोडतही जाहीर
सोलापूर महानगरपालिकेचे बहुप्रतिक्षित आरक्षण जाहीर झाले असून यामुळे अनेक ईच्छुकांची ‘कहीं खुशी कहीं गम’अशी अवस्था झाली.महानगरपालिका आरक्षणावरच आगामी राजकीय समीकरणे अवलंबून असल्याने इच्छुकांचे लक्ष आरक्षणाकडे लागले होते. महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी शहरातील सर्व प्रभागातील आरक्षणं निश्चित करण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी या आरक्षणांबरोबर महिलांच्या आरक्षणांचा समावेश आहे. हुतात्मा स्मृती मंदिरात सकाळी ११ वाजता लॉटरी सोडत तसेच आयोगाचे दिशानिर्देशद्वारे हे आरक्षण निश्चित करण्यात आलं. यावेळी नागरिक उपस्थित होते. पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली. आरक्षण सोडती वेळी इच्छुकांचे अनेक प्रभाग महिला किंवा जातनिहाय आरक्षणामध्ये अडकले गेले आहेत. विशेषतः खुल्या गटातून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांना आलेलं आरक्षण आपल्यावर राजकीय गंडांतर आल्याचं वाटू लागलं आहे.त्यामुळे अनेकांवर नवे प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे.