Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुम्ही खणखणीत नाणं दिलं तर खणखणीत विकासकामे जोमाने करू’; अजित पवारांचं बारामतीकरांना आश्वासन

माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही जातीपातीचा विचार केला नाही. या निवडणुकीत काही समाज घटकांना प्रतिनिधित्व देता आले नाही. मात्र, त्या समाजाला इतर विविध कामांच्या माध्यमातून भरीव निधी दिला जाईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 23, 2025 | 07:48 AM
'तुम्ही खणखणीत नाणं दिलं तर खणखणीत विकासकामे जोमाने करू'; अजित पवारांचं बारामतीकरांना आश्वासन

'तुम्ही खणखणीत नाणं दिलं तर खणखणीत विकासकामे जोमाने करू'; अजित पवारांचं बारामतीकरांना आश्वासन

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : ‘मी माझ्या राजकीय जीवनामध्ये शिव, शाहू, फुले व आंबेडकर यांची विचारधारा कधीच सोडणार नाही’, असा पुनरुच्चार करत २०२० पासून बारामती शहरात तब्बल पावणे दोन हजार कोटींची विकासकामे मार्गी लावली आहेत. देशातील अग्रेसर शहर म्हणून बारामतीची ओळख निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने साथ द्या, तुम्ही खणखणीत नाणं या निवडणुकीत दिलं तर, खणखणीत विकास कामे आणखी जोमाने करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना दिले.

बारामती नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ बारामती शहरातील सिद्धेश्वर मंदिरात उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव, माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार जय पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व नगरसेवक पदाचे राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, माझ्या राजकीय जीवनामध्ये बारामतीकरांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कदापिही मी तडा जाऊ दिला नाही. शहरातील निरा डावा कालवा सुशोभीकरण, बाबूजी नाईक वाडा नूतनीकरण, भव्य विविध साठवण तलाव निर्मिती, रस्त्यांचे सुशोभीकरण, कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक महाविद्यालय त्याचबरोबर सहाशे कोटी रुपये खर्चाचा शिवसृष्टी प्रकल्प , विविध समाज घटकांसाठी भरून निधी त्याचबरोबर इतर मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत.

बारामतीचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम आपण केले

बारामतीचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम आपण केले आहे. उर्वरित विकासकामे देखील लवकरच मार्गी लागतील. बारामतीची ओळख अग्रेसर शहर म्हणून निर्माण करण्यासाठी माझ्या विचारांचे सर्व नगरसेवक निवडून येणे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना साथ द्या. माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही जातीपातीचा विचार केला नाही. या निवडणुकीत काही समाज घटकांना प्रतिनिधित्व देता आले नाही. मात्र, त्या समाजाला इतर विविध कामांच्या माध्यमातून भरीव निधी दिला जाईल.

हेदेखील वाचा : इंदापुरात नगराध्यक्षपदाची लढत तापली, दोन्ही उमेदवारांची झंझावाती मोहीम; निवडणूक वातावरण रंगतदार

तसेच स्वीकृत नगरसेवक पदाच्या चार जागा आहेत, चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्याला यामध्ये संधी दिली जाईल. बारामती बस स्थानकाप्रमाणेच रेल्वे स्थानकाचे काम देखील सर्वोत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले आहे. वाहतुकीला अडथळा येणारी मंदिरे चांगल्या सुसज्ज जागेत उत्कृष्ट पद्धतीने बांधण्यात येणाऱ्या नव्या मंदिरामध्ये पुन्हा प्रतिष्ठापित केली जाणार आहेत. आपण अंधश्रद्धेला मानणारे नसलो तरी श्रद्धेला जपणारे आहोत. प्रत्येक धर्मपंथाचा आदर मी करतो. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांनी बारामती सहकारी बँकेचे काम चांगल्या पद्धतीने केले आहे, त्यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे, त्यामुळे त्यांना संधी दिली आहे इतर देखील उमेदवार उच्चशिक्षित व चांगल्या पद्धतीने काम करणारे आहेत, असेही त्यांनी म्हटले.

Web Title: Dcm ajit pawar assures of development to people of baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 07:48 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati Politics
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

इंदापुरात नगराध्यक्षपदाची लढत तापली, दोन्ही उमेदवारांची झंझावाती मोहीम; निवडणूक वातावरण रंगतदार
1

इंदापुरात नगराध्यक्षपदाची लढत तापली, दोन्ही उमेदवारांची झंझावाती मोहीम; निवडणूक वातावरण रंगतदार

Maharashtra Politics: “…परवानगीची गरज नाही”; मनसेमुळे ‘मविआ’ फुटणार? राऊतांच्या पोस्टने खळबळ
2

Maharashtra Politics: “…परवानगीची गरज नाही”; मनसेमुळे ‘मविआ’ फुटणार? राऊतांच्या पोस्टने खळबळ

कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत येणार रंगत; नगराध्यक्षपदाची लढत ‘तिरंगी’ होणार
3

कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत येणार रंगत; नगराध्यक्षपदाची लढत ‘तिरंगी’ होणार

Local Body Election: ऐन थंडीत गुहागरचे राजकारण तापले; नगराध्यक्षपदांचे अर्ज झाले बाद
4

Local Body Election: ऐन थंडीत गुहागरचे राजकारण तापले; नगराध्यक्षपदांचे अर्ज झाले बाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.