संग्रहित फोटो
दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार भरत शहा यांनी होम टू होम मोहीम आक्रमकपणे सुरू केली आहे. त्यांच्या संपर्क मोहिमेला साथ देण्यासाठी माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, बंधू मुकुंद शहा हे घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्याचसोबत जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनीही शहरात अनेकांच्या भेटी घेत प्रचाराला वेग दिला आहे. शुक्रवारपासून राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हेही शहरातील विविध भागांत सभा घेणार असून, या सभांमुळे राष्ट्रवादीच्या प्रचारात आणखी दम येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
डिजिटल प्रचारावर विशेष लक्ष
निवडणुकीचा रंगतदार माहोल फक्त रस्त्यांवरच नाही तर सोशल मीडियावरही दिसून येत आहे. दोन्ही बाजूंकडून डिजिटल प्रचारावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, बाहेरगावी असलेल्या मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग केला जात आहे. दरम्यान, शहरात जेवणावळींचा ट्रेंडही सुरू झाला आहे. प्रभागनिहाय आयोजित केल्या जाणाऱ्या या जेवणावळींनी प्रचाराला वेगळेच वळण मिळाले आहे. प्रचाराची गती वाढताच हॉटेलांमध्येही गर्दी वाढल्याचे चित्र कायम आहे. एकीकडे हिवाळ्याचा गारवा वाढत असताना, दुसरीकडे इंदापूरच्या राजकारणात ‘गरमाई’ शिगेला पोहचली असून, कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






