Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सगळी सोंग करता येतात पण पैशांचं….; लाडक्या बहिणींना 2100 देण्याबाबत अजित पवार स्पष्टच बोलले

राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेवरुन जोरदार राजाकरण रंगले आहे. मात्र महायुतीने अद्याप 2100 रुपये दिले नसल्यामुळे टीका केली जात आहे. याबाबत अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 23, 2025 | 03:57 PM
अजित पवारांमुळे भाजपा खासदार झाले नाराज

अजित पवारांमुळे भाजपा खासदार झाले नाराज

Follow Us
Close
Follow Us:

नांदेड : महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही अल्पावधीमध्ये लोकप्रिय ठरली. निवडणुकीमध्ये महायुतीसाठी ती गेमचेंजर देखील ठरली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीनंतर 2100 रुपये दिले जाईल असे आश्वासन दिले. याची पूर्तता राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये केली जाण्याची अपेक्षा होती. मात्र लाडक्या बहिणींचा हिरमोड होऊन महिनेचे हप्ते हा केवळ दीड हजार रुपयेच राहिला. याबाबत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

शासनाच्या तिजोरीत खडखडाट नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड मधील एकासभेला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा कधी मिळणार याबाबत भाष्य केले. अजित पवार म्हणाले की, ‘शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं अनेक जण बोलतात. कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प 7 लाख 20 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. यामध्ये पेन्शन, होणारे पगार, राज्य सरकारने काढलेल्या कर्जांचा व्याज जाईल. राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींसाठी आहे. विरोधक ही योजना बंद करतील असं म्हणत होते, असे मत अजित पवार यांनी मांडलं

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, मला अनेक महिला भेटल्या. त्यांनीही मला विनवलं 1500 रुपये देता 2100 रुपये द्या. मी नाही म्हटलेलं नाही. ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळी तुम्हाला 2100 रुपये देणार. पण आता मी सगळा हिशोब केला. तुम्ही जसा तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता कसा मला राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावावा लागतो. शेतकऱ्यांना काय द्यायचं, कामगारांना काय द्यायचं, मागासवर्गीयांना काय अल्पसंख्यांकांना काय.. सगळी सोंग करता येतात पैशांची सोंग करता येत नाहीत, असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अजित पवार म्हणाले की, “मला दिलेली योजना चालू ठेवायची आहे. सरकारला चालू ठेवायचे आहे. त्यामुळे यासाठी आम्ही नवीन पर्याय काढत आहोत. काही बँकांना आम्ही तयार केला आहे. जर तुम्हाला 50 हजार कर्ज काढून, एकत्र येऊन व्यवसाय करायचा आहे.. लाडक्या बहिणींमध्ये ज्या महिला या योजनेत बसतात त्यांनी एकत्र येऊन 20 एक महिला आल्या तर 20गुणिले 50000 साधारण 10 लाख रुपये घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता. वीस महिलांचे घेण्याला 30 हजाराने पैसे येतील. तुमच्या व्यवसायाचा हप्ता तुम्हाला या पैशातून देता येईल. हा उपाय राज्य सरकारने आणला आहे असे अजित पवार म्हणाले. महिला बालकल्याण खात्याच्या अदिती तटकरे नाही उद्या मी हे सांगणार आहे. मराठवाड्याला चांगल्या प्रकारची तरतूद करण्याचा प्रयत्न केलेला आहे  . त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही तिजोरीत खडखडाट आहे असे समजू नका. मी आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय,  असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Web Title: Dcm ajit pawar told about 2100 per month under the ladki bahin yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 03:56 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Ladki Bahin Yojana
  • Mahayuti Government

संबंधित बातम्या

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा
1

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड
2

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका
4

PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.