Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DCM एकनाथ शिंदेंनी केले विद्यार्थ्याचे स्वागत; ज्ञानार्जन करून लौकिक वाढवण्याचा दिला सल्ला

सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 16, 2025 | 04:13 PM
DCM Eknath Shinde visits primary school in Satara shalapavesh mohotsav

DCM Eknath Shinde visits primary school in Satara shalapavesh mohotsav

Follow Us
Close
Follow Us:
सातारा : देशातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचा पहिला दिवस आहे. शाळाचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रेरणादायी करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शाळांना भेटी दिल्या आहेत. सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट दिली. यंदाच्या वर्षी शाळा प्रवेशोत्सव 205-26 चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थांचे मनोबल वाढवून त्यांना प्रेरणा दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “शाळा ही संस्कार घडविणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्वल भावी पिढी घडवित असतात. विद्यार्थ्यांनीही कला, क्रीडा, साहित्य , संस्कृती यासह सर्व विषयांमध्ये संपूर्ण ज्ञानक्षम होण्यासाठी शिक्षकांना प्रतिसाद द्यावा. भरपूर अभ्यास करुन मोठे व्हावे व देशाचा तसेच राज्याचा नावलौकीक वाढावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पुढे शिंदे म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम राबवित आहे.  या शाळांमधील विद्यार्थ्यांनी उच्च पदावर काम करत आहेत. माजी राष्ट्रपती स्व. ए.पी.जी. अब्दुल कलाम, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानींही शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेतलेले आहे,” असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“शासनाचा आनंददायी शिक्षणावर भर आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही दबाव न घेता शिक्षणाबरोबर खेळावरही भर दिला पाहिजे. सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम हा राज्यभर राबविण्यात येत आहे. शिक्षण विभागात अमुलाग्र बदल केले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे दप्ताराचे ओझे कमी करणे, आनंददायी शिक्षण, मुलींना उच्च शिक्षण मोफत यासह अनेक योजना राज्य शासन राबवित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघर्ष करा व संघटीत व्हा असे सांगतले होते. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर देशाचा कारभार चालत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थी स्पर्धांमध्ये टिकले पाहिजेत अशा पद्धतीने त्यांना शिक्षणकांनीही दर्जेदार शिक्षण द्यावे,” असे आवानही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

उपमुख्यमंत्री शिंदेंनी साधला चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद

कोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले. मुलांनो खूप अभ्यास करा मोठे व्हा असे आवाहन केले करुन आपण भविष्यात काय होणार यासाठी आत्तापासून तयारी करा, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.

यावेळी आमदार महेश शिंदे म्हणाले की, “माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम उत्तम प्रकारे राबविण्यात येत आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे, परंतु शालेय शिक्षणाबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कारही घडवावे,” असे  यांनी सांगितले. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, “कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत आज उच्च पदावर काम करीत आहेत. शिक्षकांनी आनंददायी शिक्षणावर भर द्यावा. माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांर्गत शाळांना भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. शिक्षकांनी शिक्षणाची पायाभरणी भक्कम करावी म्हणजे शैक्षणिक इमारत भक्कम होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 
सातारा जिल्हा परिषद विविध शाळंमध्ये विविध उपक्रम राबविण्यात राज्यात अग्रेसर आहे. ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येत असून यामुळे जिल्हा परिषदेतील शाळांचा पट वाढला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. नागराजन यांनी सांगितले.
 या कार्यक्रमास शिक्षक, पालक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Dcm eknath shinde visits primary school in satara shalapavesh mohotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 04:12 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra government school
  • political news

संबंधित बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुतीसोबतच; आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केला विश्वास 
1

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुतीसोबतच; आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केला विश्वास 

Maharashtra HSC Exam 2025: पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, बारावी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ
2

Maharashtra HSC Exam 2025: पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, बारावी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ

Jyoti Waghmare : पूर आलेल्या गावात गेल्या शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे; जिल्हाधिकाऱ्यांनी झाप झाप झापलं
3

Jyoti Waghmare : पूर आलेल्या गावात गेल्या शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे; जिल्हाधिकाऱ्यांनी झाप झाप झापलं

अहिल्यानगरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती! मुस्लीम धर्मगुरुंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना, पोलिसांकडून लाठीचार्ज
4

अहिल्यानगरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती! मुस्लीम धर्मगुरुंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना, पोलिसांकडून लाठीचार्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.