Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : तो आक्षेपार्ह व्हिडिओ अन् पक्षाची झाली थू-थू; सुनेत्रा पवारांचा थेट झिरवळांना फोन

नरहरी झिरवाळ यांच्या कथित आक्षपार्ह व्हिडिओ प्रकरणामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. याच प्रकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी फोनवर चर्चा केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 02, 2026 | 12:13 PM
DCM Sunetra Pawar phone to Narhari Zirwal over viral video incident maharashtra political news

DCM Sunetra Pawar phone to Narhari Zirwal over viral video incident maharashtra political news

Follow Us
Close
Follow Us:
  • मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरण
  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी फोनवर चर्चा
  • माझी काहीही चूक नाही – झिरवाळ
Narhari Zirwal : नाशिक : राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेते हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची घडी बसवण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे आहे. मात्र याच बरोबर नेत्यांची नावे ही वादग्रस्त प्रकरणामध्ये येत असल्यामुळे अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला. यामध्ये प्रशासकीय निवासस्थानी त्यांचे हे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. तसेच नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. याच प्रकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांची फोनवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा : राष्ट्रवादीवर नेतृत्व कोणाचं? सुनेत्रा पवार की तटकरे अन् पटेलांचं? वर्चस्वाची लढाई सुरु

मीडिया रिपोर्टनुसार, मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्वतःची बाजू पक्षाच्या अध्यक्षांकडे मांडली आहे. या प्रकरणात माझी काहीही चूक नाही. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, यासाठी नाशिक जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र दिलं असल्याची माहिती मंत्री झिरवळ यांनी दिली असल्याची माहिती आहे. काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला झिरवळ यांची अनुपस्थीती होती. मात्र पक्षाच्या पुढील आठवड्यातील बैठकीत ते उपस्थित राहून आपली बाजू मांडणार, अशी देखील माहिती आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीत नरहरी झिरवाळ यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ

या प्रकरणाच्या विरोधात ट्रान्सजेंडर पवन यादव यांनी तक्रार दाखल केली आहे. मंत्री नरहरी झिरवळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रान्सजेंडरच्या तक्रारीवरून कफ परेड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रान्सजेंडरच्या भावाविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनात (एफडीए) मध्ये नोकरी लावण्याची मागणी केल्याचा, अन्यथा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं या एफआयआरमध्ये आरोप करण्यात आले आहे. व्हिडिओ व्हायरल करण्यापूर्वी एडिट केल्याचा देखील आरोप यावेळी करण्यात आला आहे.

Web Title: Dcm sunetra pawar phone to narhari zirwal over viral video incident maharashtra political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Narhari Zirval
  • NCP Politics
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Vivek Oberoi : अभिनेत्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घेतली भेट! पोस्ट शेअर करत म्हणाला “सूर्य दिसत नसला तरी…”
1

Vivek Oberoi : अभिनेत्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घेतली भेट! पोस्ट शेअर करत म्हणाला “सूर्य दिसत नसला तरी…”

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची रिक्त जागा कोणाला? भुजबळांच्या माघारीमुळे पेच वाढणार
2

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची रिक्त जागा कोणाला? भुजबळांच्या माघारीमुळे पेच वाढणार

Sunreta Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; बारामतीतील ऐतिहासिक विजयानंतर विधानसभेवर स्वारी!
3

Sunreta Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; बारामतीतील ऐतिहासिक विजयानंतर विधानसभेवर स्वारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.