Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Merger : विलिनीकरणाच्या चर्चेवरून मोठ्या घडामोडी! सुनील तटकरेंच्या विधानाने राष्ट्रवादीच्या राजकारणात पुन्हा खळबळ!

NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पुण्यात सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. 'विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील,' असं सूचक विधान करत त्यांनी राजकीय चर्चांना नवं वळण दिलं.

  • By विवेक
Updated On: Nov 10, 2026 | 01:16 PM
Sunil Tatkare

Sunil Tatkare

Follow Us
Follow Us:
  • सुनील तटकरे घेणार सुनेत्रा पवारांची भेट
  • विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
  • अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन
 

NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात चांगलाच चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता तटकरे पुण्यात दाखल झाले असून ते उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा होणार, याकडे राजकीय  वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

सुनील तटकरे यांनी पुण्यातील विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या भेटीची माहिती दिली. ‘मी आईंना भेटणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच वहिनींची भेट होणार आहे. कालच फोन करून पुण्याला येत असल्याचं त्यांना सांगितलं होतं,’ असं तटकरे म्हणाले.

विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेणार?

विलिनीकरणाच्या चर्चेबाबत विचारलं असता तटकरे यांनी सावध भूमिका घेतली. आज आपण अजित पवार यांच्या पवित्र स्मृतीस्थळावर आहोत. त्यामुळे इथे राजकीय वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, ‘विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील. शरद पवार साहेब सहा दशकांपासून राजकारणात आहेत. त्यामुळे विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचा की नाही, हा त्यांचाही निर्णय असेल,’ असं सूचक विधान त्यांनी केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण भाजपसाठी ठरणार फायद्याचे? पण काँग्रेससमोर असू शकेल राजकीय आव्हान

सध्या विलिनीकरणाचा मुद्दाच समोर नाही. मी भावनाप्रधान आहे. आज मला यावर काही बोलता येणार नाही. वहिनींशी चर्चा केल्यानंतर योग्यवेळी भूमिका मांडेन, असंही तटकरे यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीला अर्थखातं मिळालंच पाहिजे!

दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळातील अर्थखात्याबाबतही सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखातं मिळालंच पाहिजे, असं ते ठामपणे म्हणाले. अजित पवार यांनी राज्याला विक्रमी 21 अर्थसंकल्प दिले. राज्याच्या विकासात त्यांचं मोठं योगदान आहे. मलाही 2010 मध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली.

दिवाळीनिमित्त आपण खेडेगावात होतो. त्यामुळे अलीकडच्या राजकीय घडामोडींची आपल्याला फारशी माहिती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आता सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्या भेटीत काय चर्चा होते आणि विलिनीकरणाबाबत काही नवी भूमिका समोर येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

NCP Merger : ‘एवढं रवंथ गायी – म्हशीही करत नाहीत,’ दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर राऊत भडकले!

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुनील तटकरे सुनेत्रा पवार यांची भेट का घेणार आहेत?

    Ans: सुनील तटकरे पुण्यातील विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी आले आहेत. त्यानंतर ते सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

  • Que: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे काय म्हणाले?

    Ans: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील, असं सुनील तटकरे म्हणाले. शरद पवार हेही सहा दशकांपासून राजकारणात असल्याने त्यांचा निर्णय महत्त्वाचा असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

  • Que: राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्याबाबत सुनील तटकरेंची भूमिका काय आहे?

    Ans: राष्ट्रवादी काँग्रेसला राज्याचं अर्थखातं मिळालंच पाहिजे, अशी ठाम भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली. अजित पवार यांनी राज्याला 21 अर्थसंकल्प दिले असून राज्याच्या विकासात त्यांचं मोठं योगदान असल्याचं ते म्हणाले.

Web Title: Sunil tatkare sunetra pawar ncp merger statement pune vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • NCP Party
  • NCP Sharad Pawar
  • Sharad Pawar
  • Sunetra Pawar
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

NCP Merger : ‘एवढं रवंथ गायी – म्हशीही करत नाहीत,’ दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर राऊत भडकले!
1

NCP Merger : ‘एवढं रवंथ गायी – म्हशीही करत नाहीत,’ दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर राऊत भडकले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण भाजपसाठी ठरणार फायद्याचे? पण काँग्रेससमोर असू शकेल राजकीय आव्हान
2

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण भाजपसाठी ठरणार फायद्याचे? पण काँग्रेससमोर असू शकेल राजकीय आव्हान

Sunil Tatkare : ‘रामदास कदम माझ्या पाया पडले होते’; सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा, कायदेशीर नोटीसही देणार!
3

Sunil Tatkare : ‘रामदास कदम माझ्या पाया पडले होते’; सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा, कायदेशीर नोटीसही देणार!

Ajit Pawar Accident Case : अजितदादांच्या अपघाताबाबत 90 टक्के लोकांना घातपाताचा संशय? 15 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार!
4

Ajit Pawar Accident Case : अजितदादांच्या अपघाताबाबत 90 टक्के लोकांना घातपाताचा संशय? 15 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.