Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडक्या बहिणींसाठी अजित पवार यांची मोठी घोषणा; ‘शक्ती बॉक्स’ ठरणार महिलांचा तारणहार

राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. बदलापूर प्रकरणानंतर अशीच अनेक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे विरोधकांनी देखील लाडकी नाही तर सुरक्षित बहीण हवी असल्याची मागणी केली. यानंतर आता अजित पवार यांनी महिलांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. शक्ती बॉक्स राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 03, 2024 | 11:06 AM
dcm ajit pawar announced shakti box yojana

dcm ajit pawar announced shakti box yojana

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : राज्यामध्ये सध्या महिला सुरक्षा आणि सबलीकरण हे मुद्दे चर्चेमध्ये आले आहेत. राज्य सरकारकडून एकीकडे महिलांसाठी लाडकी बहीण सारख्या योजना जाहीर केल्या जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला महिलांवरील अत्याचार देखील वाढले आहेत. यामध्ये अनेक प्रकरणं समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल अधिकची माहिती दिली आहे. अजित पवार यांनी शक्ती बॉक्स हा नवीन हेल्पलाईन सुरु केली आहे. यावरुन महिलांची सुरक्षेची अधिक काळजी घेतली जाणार आहे.

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये शक्ती बॉक्स या योजनेबाबत माहिती दिली. या अभियानामध्ये युवकांचं प्रबोधन आणि महिलांची सुरक्षा याबद्दल माहिती दिली जाणार आहे. मुलींचा होणारा पाठलाग, छेडछाड, आयडी लपवून फोन करणं या सगळ्या गोष्टी मुलींना सांगता येईल. खासगी कंपन्या, एस. टी. स्टँड, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन या आणि अशा सार्वजनिक ठिकाणी शक्ती बॉक्स ठेवण्यात येतील. मुली, महिला यांच्याकडून ज्या तक्रारी येतील त्याची दखल घेतली जाईल. तसंच ज्या महिलेने, मुलीने तक्रार केली आहे त्यांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

हे देखील वाचा : आई ओरडते म्हणून मुलीने केला अत्याचाराचा बनाव; पोलिसांनी तपास केला अन्…

राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन उपाययोजना केल्या जात आहे. यासाठी अजित पवार यांनी पोलिसांशी देखील चर्चा केली आहे. त्यामुळे शक्ती बॉक्स योजनेबाबत माहिती देताना अजित पवार यांनी सांगतिले की, पुणे, पिंपरी चिंचवडनंतर बारामतीचा नंबर लागतो. शहरातील कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं आवश्यक आहे. नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला पाहिजे. बारामतीकरांना वाटतं की कायदा सुव्यवस्था व्यवस्थित रहावं ज्यांना वाटतं त्यासाठीच हा बॉक्स ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शक्ती नंबरही आपण देणार आहोत. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असं स्लोगन आपण त्याला दिलं आहे. 920939497 हा तो नंबर आहे. यावर एक कॉल केला तर मुली, महिलांना होणारा त्रास सांगता येईल. हा क्रमांक 24/7 तत्त्वावर सुरु असेल. या क्रमांकावर फोन किंवा मेसेज केल्यास त्या तक्रारीचं निवारण करण्याबाबत आणि योग्य ती कारवाई करण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे आणि संबंधित महिला किंवा मुलींची नावं गोपनीय ठेवण्यात येतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

पत्रकार परिषद, बारामती https://t.co/IeA6QykLTz

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 3, 2024

अजित पवार यांनी पुढे सांगितले की, बारामतीतल्या शाळा, कॉलेज, कंपन्या, हॉस्पिटल आणि इतर दर्शनी ठिकाणी शक्ती नंबर लावण्यात येईल. महिलांसोबत चुकीचे प्रकार, गैरप्रकार जर सांगण्यात आले तर त्याचेही निराकरण करण्यात येईल. शक्ती कक्षही स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये दोन महिला पोलीस अंमलदार असतील. महिला, मुली, बालके यांना भयमुक्त वातावरण देणं हा या कक्षाचा उद्देश असेल. कायदेविषयक मार्गदर्शन, अन्याय, समस्यांचं निराकरण असं या कक्षाचा उद्देश आहे. चौथा भाग आहे शक्ती नजर या माध्यमातून सोशल मीडिया, व्हॉट्स ॲप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इन्स्टग्राम यावर अल्पवयीन किशोरवयीन मुले शस्त्रं, बंदुक, चाकू यांसह फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करतात. असे प्रकार घडले तर तातडीची कारवाई केली जाईल. शेवटचा भाग आहे शक्ती भेट. या अंतर्गत शाळा, महाविद्यालयं, खासगी कंपन्या, एस. टी. स्टँड, महिला वसतिगृह या ठिकाणी भेटी देऊन महिलांना, मुलींना त्यांच्याबाबतचे कायदे. गुड टच, बॅड टच या सगळ्याची माहिती दिली जाणार आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Deputy chief minister ajit pawar announced shakti peti yojana for the safety of women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 11:06 AM

Topics:  

  • baramati
  • DCM Ajit Pawar

संबंधित बातम्या

बारामतीच्या महिलांकडून दुबईला हिरवी मिरची निर्यात! ग्रामीण महिला आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकल्या
1

बारामतीच्या महिलांकडून दुबईला हिरवी मिरची निर्यात! ग्रामीण महिला आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकल्या

Pune News: ग्रामीण महिलांचे कृषी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश; ४० मेट्रिक टन हिरव्या मिरचीची दुबईला निर्यात
2

Pune News: ग्रामीण महिलांचे कृषी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश; ४० मेट्रिक टन हिरव्या मिरचीची दुबईला निर्यात

अंग पुसायचा टॉवेल तरी…; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला
3

अंग पुसायचा टॉवेल तरी…; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला

25 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार, पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाट्य संकुल; अजित पवारांची महत्त्वपूर्ण घोषणा
4

25 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार, पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाट्य संकुल; अजित पवारांची महत्त्वपूर्ण घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.