Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : ‘अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर थोबाडं काळी झाली असती’; फडणवीसांचा विरोधकांना थेट टोला

अमित शाहांच्या हिंदी भाषेसंबंधी वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना थेट सुनावलं असून मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरही भाष्य केलं आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 15, 2026 | 04:58 PM
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • ‘अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर थोबाडं काळी झाली असती’, फडणवीसांचा विरोधकांना टोला.
  • राज ठाकरेंच्या ‘कावळ्याच्या शापा’च्या पोस्टची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा.
  • मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगीच्या मुद्द्यावर फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर.
 

Devendra Fadnavis : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हिंदी भाषेसंबंधीच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गट आणि मनसेकडून अमित शाह यांच्या भूमिकेवर टीका करण्यात आल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. “अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर अशी टीका झालीच नसती. त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर यांची थोबाडं काळी झाली असती,” असा जोरदार टोला फडणवीसांनी लगावला.

नवी मुंबईत झालेल्या राजभाषा संमेलनात अमित शाह यांनी हिंदी भाषेबाबत भूमिका मांडली होती. महाराष्ट्र ही देशातील सर्वात मोठी बहुभाषिक भूमी असल्याचं त्यांनी म्हटलं. मातृभाषेसोबत दुसरी राष्ट्रीय भाषा शिकण्याला विरोध करणं योग्य नसल्याचंही शाह म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

फडणवीसांचा विरोधकांना सवाल

या वादावर बोलताना फडणवीसांनी अमित शाहांचं संपूर्ण भाषण ऐकण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्रात मराठी भाषेचं महत्त्व काय आहे, मातृभाषेचं स्थान काय आहे, हे अमित शाहांनी आपल्या भाषणात स्पष्ट केल्याचं फडणवीस म्हणाले.

Manoj Jarange Patil : ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,’ जरांगे पाटील मुंबईकडे रवाना

महाराष्ट्रातील नागरिक बहुभाषिक आहेत म्हणजे त्यांची मातृभाषा बदलते असं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. “सिलेक्टिव्ह ऐकायचं आणि त्यावर टीका करायची, हे योग्य नाही,” असं म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावलं.

राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टचीही जोरदार चर्चा आहे. “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच…” अशी मोजक्या शब्दांत पोस्ट राज ठाकरेंनी केली.

अमित शाह यांच्या राजभाषा संमेलनातील वक्तव्यानंतर ही पोस्ट करण्यात आल्याने त्याचा रोख नेमका कोणाकडे आहे, यावर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

जरांगे आंदोलनावर फडणवीस काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरही फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली. कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. जरांगे यांनी पुन्हा अर्ज केला असून त्यावर गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेतला जाईल, असं फडणवीस म्हणाले. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि पुण्यात मोठी गर्दी असते, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप

Web Title: Devendra fadnavis amit shah hindi language statement opposition manohar jarange

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Amit Shah
  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Maharashtra Cabinet Meeting : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारचे 7 मोठे निर्णय
1

Maharashtra Cabinet Meeting : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारचे 7 मोठे निर्णय

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी
2

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप
3

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप

‘भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत अन्न…’; काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा?
4

‘भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत अन्न…’; काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.