Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत अन्न…’; काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा?

Amit Shah: वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेंशन सेंटरमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वतीने आयोजित ‘हिंदी दिवस २०२६’ आणि ‘सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलना’चे उद्घाटन अत्यंत उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 14, 2026 | 08:15 PM
अमित शहा

अमित शहा

Follow Us
Follow Us:
  • हिंदी, मराठीसह सर्व भारतीय भाषांचा परस्पर आदर करण्याचा संकल्प करा- फडणवीस 
  • विविध ॲप्स, पुस्तके आणि शब्दकोश उपक्रमांचे लोकार्पण
  • ‘हिंदी दिवस २०२६’ व ‘सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलना’चा शुभारंभ
ठाणे: भारतीय भाषांचे संवर्धन, सन्मान आणि विकास हा केंद्र शासनाचा प्रमुख आणि दृढ संकल्प असून सर्व प्रादेशिक भाषा या कमळाच्या विविध पाकळ्यांप्रमाणे सुंदर आहेत. या सर्व समृद्ध भाषांचा आदर राखत हिंदीला त्यांच्यामध्ये समन्वय साधणारा ‘मध्यमणी’ बनवूया, असे आवाहन केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी केले.

वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेंशन सेंटरमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वतीने आयोजित ‘हिंदी दिवस २०२६’ आणि ‘सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलना’चे उद्घाटन अत्यंत उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, खासदार नरेश म्हस्के, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राजभाषा विभागाच्या सचिव अंशुली आर्या, व्ही.एल. कांताराव, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे वंशज जॉयदीप चट्टोपाध्याय, मिलिंद प्रभाकर सबनीस हे मान्यवर उपस्थित होते.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, राजभाषा संमेलने केवळ राजधानी दिल्लीपुरती मर्यादित न ठेवता देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये नेण्याचा केंद्र शासनाचा निर्णय यशस्वी ठरला असून, या उपक्रमांतर्गत हे सहावे संमेलन महाराष्ट्रात होत आहे.

Devendra Fadnavis : ‘हिंदी माझी मावशी, मराठी माझी आई,’ अमित शाहांसमोर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रातील गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी व्यापक स्वरूप देऊन देशात सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि देशभक्तीची भावना चेतवली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वशासनासोबतच स्वधर्म आणि स्वभाषेला अग्रक्रम देत मराठीच्या विकासासाठी राजव्यवहार कोश तयार केला होता. तसेच गुलामगिरीच्या काळात ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘आनंदमठ’मध्ये रचलेले ‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नसून स्वातंत्र्यलढ्याची राष्ट्रीय उद्घोषणा ठरले होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय समारंभांमध्ये ‘वंदे मातरम्’ पूर्ण स्वरूपात सादर करण्याची परंपरा पुन्हा सुरू केली आहे, तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान देऊन महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अस्मितेचा गौरव केला आहे.

मातृभाषेचे महत्त्व विषद करताना गृहमंत्री म्हणाले की, मातृभाषा ही मानवी विचारप्रक्रियेचा मूळ पाया असून ती व्यक्तीला स्वतःच्या संस्कृती, परंपरा आणि मूल्यांशी जोडून ठेवते. याच कारणास्तव राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. यासोबतच देशाशी नाते अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक तरी अन्य भारतीय भाषा शिकली पाहिजे.

Amit Shah -Eknath Shinde Meeting: अमित शाहांची पुन्हा एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक; भाजपच्या गोटात अस्वस्थता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राजभाषा विभागाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला असून, भारत सरकारच्या पाच लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना हिंदीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘कंठस्थ २.०’ प्रणाली पाच कोटींपेक्षा अधिक वाक्यांसह उपलब्ध करण्यात आली असून ‘लीला राजभाषा’ व ‘लीला प्रवाह’च्या माध्यमातून भाषा शिक्षणाला गती मिळाली आहे. सुरुवातीला ५१ हजार शब्द असलेला ‘हिंदी शब्दसिंधू’ शब्दकोश आता आठ लाख शब्दांपर्यंत विस्तारला असून २०२९ पर्यंत तो जगातील सर्वांत मोठा शब्दकोश बनेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Amit shah concept of ek bharat shreshtha bharat will realized only through respect indian languages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Hindi Language
  • Marathi Language
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘माय मरो पण मावशी जगो!’; फडणवीसांच्या ‘मराठी आई, हिंदी मावशी’ विधानावर अंबादास दानवेंचा खोचक टोला
1

‘माय मरो पण मावशी जगो!’; फडणवीसांच्या ‘मराठी आई, हिंदी मावशी’ विधानावर अंबादास दानवेंचा खोचक टोला

3 हजार कोटींचा मालक आमदार बनला रस्त्यावरचा भिकारी ! मुंबईतील भाजप आमदाराचा भीक मागतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं कारण काय?
2

3 हजार कोटींचा मालक आमदार बनला रस्त्यावरचा भिकारी ! मुंबईतील भाजप आमदाराचा भीक मागतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं कारण काय?

Devendra Fadnavis : ‘हिंदी माझी मावशी, मराठी माझी आई,’ अमित शाहांसमोर फडणवीसांचं मोठं वक्तव्य
3

Devendra Fadnavis : ‘हिंदी माझी मावशी, मराठी माझी आई,’ अमित शाहांसमोर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

धक्कादायक ! दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार; डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री झाली अन् हॉटेलमध्ये नेत…
4

धक्कादायक ! दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार; डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री झाली अन् हॉटेलमध्ये नेत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.