Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपदाची ऑफर अन् अमिमहाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संतापत शाहांकडूनच भाजपची ऑफर; बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा
Amit Shah : महाराष्ट्रातील मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्र हा बहुभाषिक प्रदेश असल्याचं वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी अमित शाहांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य असल्याची आठवण करून दिली.
‘महाराष्ट्रात येऊन अमित शाह यांनी मराठीचा अपमान करू नये. महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे,’ असं म्हणत काळेंनी थेट इशारा दिला. गरज पडल्यास संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास सांगणारं पुस्तक अमित शाहांना पाठवू, असंही त्यांनी म्हटलं.
गजानन काळे म्हणाले की, महाराष्ट्र हा बहुभाषिक प्रदेश असल्याचं सांगताना मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा इतिहास विसरता कामा नये. हिंदी भाषा शिकण्यास कोणाचाही विरोध नाही, मात्र हिंदीच्या नावाखाली मराठी भाषेवर आक्रमण केलं जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Devendra Fadnavis : ‘हिंदी माझी मावशी, मराठी माझी आई,’ अमित शाहांसमोर फडणवीसांचं मोठं वक्तव्य
‘ज्याला हिंदी भाषेत व्यवहार करायचा आहे, तो नक्की हिंदी शिकेल. मात्र हिंदी भाषा संमेलनाच्या आडून मराठी भाषेवर आक्रमण करून महाराष्ट्राचा अपमान करणं महाराष्ट्र खपवून घेणार नाही,’ असा इशारा काळेंनी दिला.
यावेळी त्यांनी तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि दक्षिणेतील राज्यांचाही संदर्भ दिला. अशाच प्रकारची भाषा अमित शाह इतर राज्यांमध्ये करू शकतील का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामुळे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे महाराष्ट्राची ओळख आणि मराठी भाषेचं महत्त्व समजून घेण्यासाठी अमित शाहांना संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाचं पुस्तक पाठवू, असं गजानन काळे म्हणाले.
महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर अमित शाह यांना पडला आहे
* महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे असं म्हणत महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा अपमान करणारे विधान अमित शाह हिंदी भाषा संमेलनात येऊन करतात ..
* एका बाजूला ते म्हणतात गुजरात मध्ये गुजराती बोलली जाते हिंदी येत नाही… pic.twitter.com/gGQbBek1nM — Gajanan Kale (@MeGajananKale) September 14, 2026
दरम्यान, अमित शाह यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य, स्वभाषा आणि मराठी भाषेच्या योगदानाचा उल्लेख केला. महाराष्ट्राच्या बहुभाषिक संस्कृतीला आपण प्रणाम करतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात मराठीसोबत कोकणी, गुजराती, हिंदी, सिंधी, वारली अशा अनेक भाषांचा विकास झाला असून त्यांचा सन्मान झाला पाहिजे, असं शाह यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
Amit Shah UCC Statement : अमित शाहांचा मोठा दावा! लवकरच लागू करणार समान नागरी कायदा
अमित शाह यांनी गुजरातचा दाखला देत गुजरातमध्ये गुजराती भाषा बोलली जाते आणि हिंदी बोलली जात नाही, असं सांगितलं. राष्ट्रीय पातळीवर काम करताना आपल्याला हिंदी समजत आणि बोलता येत असल्याने अडचण आली नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेच्या शुद्धीकरणासाठी केलेल्या कामाचाही शाह यांनी उल्लेख केला. भारतातील प्रत्येक भाषा समृद्ध करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
मात्र, या वक्तव्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने मराठी विरुद्ध हिंदी भाषेचा मुद्दा पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात तापण्याची चिन्हं आहेत.






