Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan parishad Election 2026: नाशिक, संभाजीनगर, पुण्याचा तिढा कायम: विधान परिषद जागावाटपावर फडणवीसांचे सूचक विधान

Vidhan parishad Election 2026: राज्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अतिरिक्त इंधन साठवू नये, असे आवाहन करताना फडणवीस म्हणाले, “राज्याचा एकूण इंधन कोटा गेल्या वर्षीइतकाच आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.”

  • By anuradha sagar
Updated On: May 25, 2026 | 04:35 PM
Devendra Fadnavis, MLC Election, Maharashtra Politics,

Devendra Fadnavis, MLC Election, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • महायुतीतील जागावाटपावरून अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा
  • जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
  • अनेक देशांमध्ये इंधन आणीबाणी आणि अंशतः टाळेबंदीची परिस्थिती
MLC Election Seat Sharing : आगामी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावरून अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. असे असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, “तीन मोठे राजकीय पक्ष एकत्र निवडणूक लढवत असताना प्रत्येक पक्ष आपापल्या मजबूत जागांवर दावा करतो, हे स्वाभाविक आहे. मात्र, याचा अर्थ महायुतीमध्ये फूट आहे असा होत नाही.”

मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर दरोडा, पेट्रोल-डिझेलची दरवाढ तात्काळ मागे घ्या, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा

नाशिक, संभाजीनगर आणि पुणे जागांवर चर्चा

जागावाटपााबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले की, जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसह नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या जागांवर चर्चा सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी दोन्ही पक्षांचे प्रभावी अस्तित्व आहे. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत पुणे जागेबाबत चर्चा सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीतील सर्व पक्ष एकत्र बसून लवकरच सकारात्मक तोडगा काढतील आणि विजय निश्चित करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

इंधन संकटावर सरकार सतर्क

विधान परिषद निवडणुकीबरोबरच फडणवीस यांनी राज्यातील इंधन संकट आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवरही भाष्य केले. “सध्या जागतिक स्तरावर गंभीर भू-राजकीय परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या पुरवठा साखळीवर होत आहे.” असं त्यांनी नमुद केलं.

“अनेक देशांमध्ये इंधन आणीबाणी आणि अंशतः टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्र सरकार राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा कायम ठेवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे,” असे फडणवीस म्हणाले.

Padma Awards 2026: राष्ट्रपती भवनात आज रंगणार पद्म पुरस्कार सोहळा! द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते १३१ दिग्गजांचा गौरव

साठेबाज आणि अफवा पसरवणाऱ्यांना इशारा

शेतकऱ्यांना इंधनाची कमतरता भासू नये, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्तरावर नियमित आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात इंधनटंचाई निर्माण होईल या भीतीमुळे नागरिक घाबरून मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याने मागणीत अचानक २० टक्क्यांनी वाढ झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

याच पार्श्वभूमीवर कोणत्याही डीलर किंवा मध्यस्थाने अवैध इंधन साठेबाजी करू नये, असा कडक इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पेट्रोल पंपांवर अचानक तपासण्या करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.

कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांना निर्देश

राज्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अतिरिक्त इंधन साठवू नये, असे आवाहन करताना फडणवीस म्हणाले, “राज्याचा एकूण इंधन कोटा गेल्या वर्षीइतकाच आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.”

पेट्रोल पंपांवरील वाढती गर्दी लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून, अफवा पसरवणारे आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

Web Title: Devendra fadnavis on mlc polls seat sharing decision on nashik sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
2

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा
3

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान
4

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.