Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मोठा निर्णय! फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची विशेष बैठक पार पडली. शरद पवारांसह सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन लढाई अधिक ताकदीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • By विवेक
Updated On: Jul 08, 2026 | 08:19 PM
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मोठा निर्णय! फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मोठा निर्णय! फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज विधिमंडळातील मंत्रिमंडळ बैठक सभागृहात उच्चाधिकार समितीची विशेष बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सीमावादाच्या खटल्यात महाराष्ट्राची बाजू अधिक भक्कमपणे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार नारायण राणे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार जयंत पाटील, सुरेश खाडे, सचिन कल्याण शेट्टी, रोहित आर. पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, प्रकाश आवाडे तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कायदेतज्ज्ञ उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयातील लढाई अधिक ताकदीने लढण्याचा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या न्यायालयीन लढ्याला अधिक बळ देण्यावर भर देण्यात आला. बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातील मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.

मोठी बातमी ! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला; बंद दालनाआड नेमकी काय चर्चा?
सीमाप्रश्नी कायदेशीर रणनीती अधिक मजबूत करण्यासाठी वरिष्ठ वकिलांसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. न्यायालयीन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्याबाबतही बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

शरद पवारांची उपस्थिती ठरली चर्चेचा विषय

सीमाप्रश्नी झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे आमदार तसेच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. सीमाप्रश्नावर शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून सातत्याने भूमिका घेतली असून त्यांच्या उपस्थितीमुळे बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

📍 मुंबई |#महाराष्ट्र – #कर्नाटक राज्यातील सीमाप्रश्नावर आज उच्चाधिकार समितीची विशेष बैठक विधिमंडळाच्या मंत्रिमंडळ बैठक सभागृहात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात… pic.twitter.com/tFBdqGmu1M — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 8, 2026

एकनाथ शिंदे यांच्या दालनात शरद पवारांची भेट

बैठकीनंतर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाला भेट दिली. यावेळी शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठकही पार पडली. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. सीमाप्रश्नी सर्वपक्षीय एकजूट कायम ठेवत न्यायालयीन लढा अधिक प्रभावीपणे लढण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणावरून मोठी खलबतं?

Web Title: Maharashtra karnataka border dispute high level committee meeting devendra fadnavis sharad pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Maharashtra Karnataka Border Dispute
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली
1

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
3

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
4

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.