Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harshwardhan Sapkal News: मुख्यमंत्र्यांच्या तोंडी पानटपरीवरील टपोरीची भाषा शोभत नाही; ‘मिसिंग लिंक’वरून सपकाळांचा पलटवार 

Harshwardhan Sapkal: मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याच्या प्रकारानंतर राज्यभरातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत आहे. विरोधकांच्या नात्याने आम्हीदेखील सैंविधानिक शब्दांत टिका करत आहोत पण फडणवीसांनी विरोधाकांसाठी 'भाडे के टट्टू' असा शब्द वापरणे हा राज्यातील जनतेचा अपमान आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 10, 2026 | 10:55 AM
Harshwardhan Sapkal, Devendra Fadnavis, Missing Link Row, Samruddhi Mahamarg, Congress Vs BJP,

Harshwardhan Sapkal, Devendra Fadnavis, Missing Link Row, Samruddhi Mahamarg, Congress Vs BJP,

Follow Us
Follow Us:
  • राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडी पानटपरीवरील टपोरीची भाषा शोभत नाही- हर्षवर्धन सपकाळ
  • फडणवीसांनी स्वतःची शेतीवाडी किंवा कुटुंबाचे दागिने विकून हा प्रकल्प उभा केलेला नाही; हा जनतेचा पैसा- हर्षवर्धन सपकाळ
  • मिसिंग लिंक आणि समृद्धी महामार्गात किती भ्रष्टाचार झालाय हे समोर आले पाहिजे- हर्षवर्धन सपकाळ
Harshwardhan Sapkal  Criticized Devendra Fadnavis: मिसिंग लिंकवरून टिका झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात बोलताना विरोधकांबाबत बोलताना ‘थोबाड’, ‘कुत्रा’ असे शब्द वापरले. ही भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही. हे नळावरचे भांडण नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडी पानटपरीवरील टपोरीची भाषा शोभत नाही,” अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. ते बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांना अहंकाराची बाधा झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. (Maharashtra Politics news)

मिसिंग लिंकवरून झालेल्या टिकेनंतर आणि ते इन्फ्रामॅन नाही डिझास्टर मॅन आहेत हे समोर आल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना राग अनावर झाला. त्यावरून त्यांनीविरोधकांवर जोरदार आगपाखडही केली. देवेंद्र फडणवीस नेहमी सांगतात की मिसिंग लिंक मी बांधला पण तुम्ही स्वत:ची शेतीवाडी किंवा कुटुंबाचे दागिने विकून मिसिंग लिंक बांधलेला नाही. एवढा मीपण आणि अहंकार योग्य नाही.” अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

‘हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले’; मिसिंग लिंकवरील टीकेला फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार

मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याच्या प्रकारानंतर राज्यभरातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत आहे. विरोधकांच्या नात्याने आम्हीदेखील सैंविधानिक शब्दांत टिका करत आहोत पण फडणवीसांनी विरोधाकांसाठी ‘भाडे के टट्टू’ असा शब्द वापरणे हा राज्यातील जनतेचा अपमान आहे. मिसिंग लिंकवरून टिका केल्याने लगेच फडणवीसांचा काय अपमान झाला, त्याना कोणी शिव्या दिल्या की एकेरीत बोलले, इतक्या हजार कोटींचा खर्च करूनही मिसिंग लिंक पहिल्याच पावसात गळते तेव्हा महाराष्ट्राचीच बदनामी होते. फडणवीस म्हणतात एक कोटी खोटारडे मेल्यावर काही लोकं जन्माला येतात. आता मी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान करतो की, आपल्या दोघांची नार्को टेस्ट करु. मिसिंग लिंक आणि समृद्धी महामार्गात किती भ्रष्टाचार झालाय हे समोर आले पाहिजे, अशा शब्दांत हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांना आव्हान केलं आहे.

मिसिंग लिंकबाबत मी टिका केल्यावर फडणवीस म्हणाले की ज्याला समजत नाही, ज्याला अक्कल नाही त्याच्यावर काय बोलायचे पण हादेखील फडणवीसांचा अहंकार आहे. फडणवीस ज्या विचारांच्या पठडीतून आले आहेत त्यांचा विचार आहे की, सगळं ज्ञान आम्हालाच आहे, आम्ही सोडून सगळे निर्बुद्ध आहेत. हाच हेका फडणवीसांच्या आरोपातून पुन्हा दिसून आलात. १० वर्षांनी आम्ही असू पण विरोधक शिल्लक राहणार नाहीत, या वक्तव्यातून त्यांच्या पक्षाची विचारसरणी दिसून येते.” अशी टिकाही सपकाळ यांनी यावेळी केली.

‘मिसिंग लिंकवर प्रश्न विचारला तर राजकारण?’ राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल; सभेत केली मिमिक्री

काय म्हटले होते देवेंद्र फडणवीस?

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुसळधार पावसानंतर मिसिंग लिंक प्रकल्पावरून खोटी माहिती पसरवली जात आहे. इतके खोटारडे लोक पैदा झाले आहेत, एक हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले असतील,” असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, “महायुती सरकारने धाडस दाखवून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला. मागील सरकारने हा प्रकल्प शक्य नसल्याचे सांगत अनेक कारणे दिली होती,” असा दावाही त्यांनी केला.

फडणवीस यांनी सांगितले की, “मिसिंग लिंक हा केवळ रस्ता नसून भारतातील अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे. या प्रकल्पामुळे भारतातील सर्वात उंच पूल आणि जगातील मोठ्या बोगद्यांपैकी एक उभारण्यात आला असून घाट विभागातील अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे.”

 

 

Web Title: Maharashtra politics harshwardhan sapkal challenges devendra fadnavis for narco test missing link

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Harshwardhan Sapkal

संबंधित बातम्या

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
1

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
3

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा
4

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.