Padma Awards 2026: राष्ट्रपती भवनात आज रंगणार पद्म पुरस्कार सोहळा! द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते १३१ दिग्गजांचा गौरव
केंद्र सरकारने २०२६ या वर्षासाठी एकूण १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये पाच पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांपैकी १९ महिला आहेत, तर १६ जणांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित केले जाईल. पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत.
दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण पुरस्काराने, तर दिवंगत नेते आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन आणि गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाईल. क्रिकेटपटू रोहित शर्मा, बॉलीवूड अभिनेते आर. माधवन, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, पॅरा-ॲथलीट प्रवीण कुमार आणि हॉकीपटू सविता पुनिया यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
१९५४ मध्ये सुरू झालेले हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनी जाहीर केले जातात. विविध क्षेत्रांमध्ये विशेष आणि उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा या पुरस्कारांचा उद्देश आहे. हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकशास्त्र, समाजकार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक प्रशासन आणि व्यवसाय व उद्योग यांसारख्या क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जातात.
पद्म पुरस्कार हे भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत. त्यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा समावेश आहे. हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, वैद्यक, विज्ञान, क्रीडा, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, व्यवसाय आणि उद्योग इत्यादी क्षेत्रांतील उत्कृष्ट योगदानासाठी दिले जातात.






