Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप फेटाळत संविधानाच्या चौकटीत न्याय देण्याचे आश्वासन दिले.

  • By विवेक
Updated On: Aug 11, 2026 | 09:47 PM
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • कोणाचेही कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेले नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
  • चंद्रशेखर बावनकुळेंना ओबीसी असल्यामुळे टार्गेट करणे योग्य नसल्याचे फडणवीस म्हणाले.
  • मराठा, ओबीसी आणि एससी समाज समान असल्याचे सांगत संविधानाच्या चौकटीतच निर्णय घेण्याची भूमिका.
 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करत आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कुणबी प्रमाणपत्रे रद्द करत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे.

या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत कोणाचेही कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेले नसल्याचे स्पष्ट केले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री म्हणून आपले कर्तव्य पार पाडले आहे. त्यांना अशा पद्धतीने लक्ष्य करणे योग्य नाही, असे फडणवीस म्हणाले.

‘ओबीसी आहेत म्हणून टार्गेट करणं योग्य नाही’

बावनकुळे हे ओबीसी समाजातून येतात म्हणून त्यांना लक्ष्य करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. सरकार संविधानाच्या चौकटीत काम करते आणि मराठा, ओबीसी तसेच एससी समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…

‘एकाच्या ताटातले काढून दुसऱ्याला देणार नाही’, असे सांगत कोणत्याही समाजाच्या हक्कावर गदा आणून दुसऱ्या समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा विचार नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल आणि संविधानाच्या चौकटीत जे शक्य आहे, त्यानुसार न्याय दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात उद्योगांसाठी नवे वातावरण

दरम्यान, पुण्यात बोलताना फडणवीस यांनी राज्याच्या औद्योगिक विकासावरही भाष्य केले. महाराष्ट्रात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर अर्थात GCC चे इकोसिस्टम विकसित करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात संशोधन आणि विकास केंद्रे, पायाभूत सुविधा आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त FSI उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यावरही सरकार काम करत असल्याचे फडणवीस म्हणाले.

AI आणि कौशल्य विकासावर भर

दावोस येथे AI आणि डेटा सायन्ससंदर्भात सामंजस्य करार करण्यात आल्याचे सांगत फडणवीस यांनी नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही उद्योगांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्याची माहिती दिली.

तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांवरील कँटीनकडे; सिल्लोडमध्ये FDA ची धडक कारवाई

जागतिक स्तरावर वेगाने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात अधिक सक्षम करण्याचा सरकारचा मानस असून, राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा आगामी काळातही राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांच्या आरोपांवर सरकारकडून आलेल्या स्पष्टीकरणामुळे या मुद्द्यावरचा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Devendra fadnavis reaction manoj jarange patil kunbi certificate chandrashekhar bawankule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 09:47 PM

Topics:  

  • chandrashekar bawankule
  • devendra fadnavis
  • Manoj Jarang patil

संबंधित बातम्या

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
1

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Maharashtra Drought : बळीराजाला बाप्पा पावणार! राज्य सरकार शनिवारपूर्वी पहिली अधिसूचना काढणार, फडणवीसांची मोठी घोषणा
2

Maharashtra Drought : बळीराजाला बाप्पा पावणार! राज्य सरकार शनिवारपूर्वी पहिली अधिसूचना काढणार, फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ
3

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
4

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.