Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अंधारे आल्या अन् सेना गेली, वैफल्यातून पालकमंत्र्यांवर आरोप’ – आमदार देवेंद्र कोठे, सुषमा अंधारेंच्या टीकेला भाजपचा पलटवार

सोलापूर दौऱ्यात सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर भाजपने जोरदार पलटवार केला आहे. आमदार देवेंद्र कोठे आणि सचिन कल्याणशेट्टी यांनी अंधारेंची टीका राजकीय वैफल्यातून असल्याचा दावा केला.

  • By विवेक
Updated On: Aug 10, 2026 | 09:55 PM
Sushma Andhare

Sushma Andhare

Follow Us
Follow Us:

सोलापूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोलापूर दौऱ्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेले आरोप हे वस्तुस्थितीला धरून नसून राजकीय वैफल्यातून केलेले आहेत. सुषमा अंधारे यांचे राजकीय अस्तित्व संपले असून, स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्या भाजप आणि महायुतीच्या नेत्यांवर व्यक्तिगत टीका करीत आहेत, असा जोरदार पलटवार आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.

सुषमा अंधारे यांनी सोलापूर दौऱ्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विविध आरोप केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, “अंधारे अक्का म्हणजे पंगतीला बसले आणि जेवण संपले, अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्या वैफल्यग्रस्त झाल्यामुळे अशा प्रकारची वक्तव्ये करीत आहेत.” राजकीय आणि सामाजिक जीवनात गुन्हे दाखल होणे ही काही नवीन बाब नाही. काही गुन्हे वैयक्तिक स्वरूपाचे असतात, तर काही वेळा राजकीय विरोधकांकडूनही जाणूनबुजून गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे म्हणून त्याचा थेट राजकारणाशी संबंध जोडणे योग्य नाही, असेही कोठे यांनी स्पष्ट केले.

आमदारकी मिळेल, खासदारकी मिळेल, या अपेक्षेने काही जण शिवसेनेत गेले. मात्र त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. त्यांच्यानंतर राजकारणात आलेल्या सोलापूरच्या भीमकन्या ज्योती वाघमारे खासदार झाल्या. याचे शल्य त्यांच्या मनात असावे. त्यातूनच त्यांच्याकडून अशी वक्तव्ये होत आहेत,” असा टोला कोठे यांनी लगावला.

मुंबईत एकनाथ शिंदेंचा नवा प्लान? सचिन अहिरांकडे संघटनेची धुरा सोपवण्याच्या हालचालींना वेग

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि महायुती सोलापूरच्या विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहे. मात्र विरोधकांकडे विकासाच्या प्रश्नांवर बोलण्यासारखे काही नसल्याने ते व्यक्तिगत आरोप करण्याचा मार्ग स्वीकारत आहेत, अशी टीका आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली.

“महायुतीसोबत अनेक नेते आणि कार्यकर्ते जोडले गेले आहेत. जयकुमार गोरे यांनी पक्षासाठी मोठे काम केले आहे. चार वेळा निवडून येत विविध स्तरांवर पक्षाला विजय मिळवून देणाऱ्या नेतृत्वावर केवळ राजकीय विरोधातून आरोप करणे योग्य नाही,” असे कल्याणशेट्टी म्हणाले.

मुंबई महापालिकेतील कारभार जनतेला माहिती

सुषमा अंधारे यांच्या पक्षाच्या मुंबई महापालिकेतील कारभाराबाबतही आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. “मुंबई महापालिकेत त्यांच्या पक्षाने काय केले, हे जनतेला चांगले माहिती आहे. जनतेपासून काहीही लपून राहिलेले नाही. त्यामुळे दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःच्या पक्षाचा आणि स्वतःच्या मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घ्यावा,” असा सल्ला कोठे यांनी दिला.

व्यक्तिगत टीका करून राजकारण करण्यापेक्षा विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाण्याची भूमिका भाजपची आहे. सोलापूरच्या विकासासाठी महायुतीचे लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करीत आहेत. त्यामुळे अंधारे यांच्या आरोपांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वसतिगृह; २० गुंठे जमीन देण्याचे आमदार शंकर जगताप यांचे आश्वासन

“सुषमा अंधारे यांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व आणि पक्षाची स्थिती तपासावी. सकाळ-संध्याकाळ आरोपांचे भोंगे वाजवून जनतेचा विश्वास मिळत नाही. कामाच्या माध्यमातून विश्वास निर्माण करावा लागतो,” अशा शब्दांत देवेंद्र कोठे यांनी अंधारेंवर टीकास्त्र सोडले.

यावेळी दोन्ही आमदारांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील आरोप फेटाळून लावत, “अंधारे यांची वक्तव्ये निराधार असून ती राजकीय निराशा आणि वैफल्यातून आलेली आहेत,” असा दावा केला. महायुती सरकार विकासाच्या मुद्द्यांवर ठाम असून आगामी काळात सोलापूरच्या विकासासाठी आणखी प्रभावीपणे काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Devendra kothe sushma andhare jaykumar gore solapur bjp counterattack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 09:55 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • shivsena
  • sushma andhare

संबंधित बातम्या

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
1

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग
2

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?
4

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.