Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद

२३ सप्टेंबर २०२६ च्या मुख्य घडामोडींमध्ये महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा आणि अल निनोचा प्रभाव, दुष्काळग्रस्त भागांचा राजकीय दौरा, आशियाई खेळात भारतीय महिला क्रिकेट संघाचे सुवर्णपदक आणि इस्रो-युरोपियन स्पेस एजन्सीचा महत्त्वपूर्ण करार या प्रमुख बातम्यांचा समावेश आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 23, 2026 | 09:45 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 23. 09.2026

Maharashtra Breaking News Today 23. 09.2026

Follow Us
Follow Us:
  • 23 Sep 2026 09:45 AM (IST)

    23 Sep 2026 09:45 AM (IST)

    Fuel Price Update: आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतार चालूच; देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर 

    Fuel Price Update: जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत सातत्याने चढ-उतार होत असले, तरी आज देशभरात इंधनाचे दर स्थिर राहिले आहेत. तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या ताज्या दरांनुसार, देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही मोठी वाढ किंवा कपात झालेली नाही. सध्या देशात पेट्रोलचा सरासरी दर १११.२१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ९७.८३ रुपये प्रति लिटर नोंदवला गेला आहे. इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत देशाची राजधानी दिल्लीत इंधनाचे दर सर्वात कमी आहेत. 

  • 23 Sep 2026 09:36 AM (IST)

    23 Sep 2026 09:36 AM (IST)

    Cancer Drug Price Overcharging: कॅन्सरच्या औषधांवरील नफेखोरीवरून सुप्रीम कोर्ट आक्रमक 

    Cancer Drug Price Overcharging:   कॅन्सरसारख्या गंभीर आजारावरील उपचारांदरम्यान औषध कंपन्या आणि विक्रेत्यांकडून होणाऱ्या अवाढव्य नफेखोरीवर सुप्रीम कोर्टाने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. कॅन्सरचे उपचार आधीच अत्यंत किचकट आणि खर्चिक असताना, औषधांच्या विक्रीत चाललेल्या या उघड लुटीवरून न्यायालयाने संबंधित घटकांची चांगलीच खरडपट्टी काढली.

    देशात सध्या एका औषधाची मूळ कमाल किरकोळ किंमत (MRP) २,७०० रुपये असताना रिटेलर्सना किंवा प्रत्यक्ष ग्राहकांना ते औषध तब्बल २७ हजार रुपयांना विकले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मूळ किमतीच्या दहा पट अधिक दराने विक्री करून रुग्णांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली.

  • 23 Sep 2026 09:30 AM (IST)

    23 Sep 2026 09:30 AM (IST)

    Drought In Solapur: दक्षिण सोलापुरात पाझर तलाव कोरडा पडल्याने संकट गहिरे

    Drought In Solapur: दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालली आहे. नांदणी गावाचा आणि परिसराचा मुख्य पाण्याचा आधार असलेला पाझर तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याने स्थानिक नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट ओढवले आहे.

    गेल्या वर्षी याच काळात हा पाझर तलाव पाण्याने तुडूंब भरून वाहत होता. मात्र, यंदा सप्टेंबर महिना उजाडला तरी तलावात पाण्याचा थेंबही शिल्लक राहिलेला नाही. नांदणीसह परिसरातील ५ ते ६ गावांसाठी हा तलाव अत्यंत महत्त्वाचा जलस्रोत मानला जातो. हा जलसाठा आटल्यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच पशुधनाच्या चाऱ्या-पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

     

  • 23 Sep 2026 09:25 AM (IST)

    23 Sep 2026 09:25 AM (IST)

    UP Rajysabha Election: उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर 

    UP Rajysabha Election:  उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या ११ जागांसाठी तसेच एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक जाहीर होताच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत संख्याबळाच्या गणितानुसार सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजप ८ जागांवर सहज विजय मिळवून आपले वर्चस्व कायम राखण्याच्या स्थितीत आहे.संख्याबळाच्या जोरावर समाजवादी पक्षाला २ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बहुजन समाज पक्षाकडे (BSP) आवश्यक आमदारांचे संख्याबळ नसल्यामुळे त्यांची रिक्त होणारी जागा पुन्हा जिंकणे अत्यंत कठीण झाले आहे.

  • 23 Sep 2026 09:20 AM (IST)

    23 Sep 2026 09:20 AM (IST)

    Cold desert in India: भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान,

    Cold desert in India: जेव्हाही आपण राजस्थान या ठिकाणाविषयी बोलतो तेव्हा मनात उष्ण वातावरण आणि वाळवंटाचा विचार येतो. थर वाळवंट त्याच्या सोनेरी वाळू, उंच वाळूचे ढिगारे आणि भाजून काढणाऱ्या उष्णतेसाठी जगभर ओळखले जाते. राजस्थानच्या अनेक भागात वाळूचा विस्तीर्ण प्रदेश आणि प्रखर सूर्यप्रकाश पाहायला मिळतो. उन्हाळ्यात तापमान खूप वाढते आणि दिवसा वाळू इतकी गरम होते की यावरुन चालणेही कठीण होऊन बसते. पण विचार करा, जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, वाळवंटात तुम्हाला उष्ण वाऱ्यांशिवाय थंड बर्फाळ वाऱ्यांचा अनुभव घ्यायला मिळेल तर तुम्हाला हे पटेल का? हिवाळ्यात तापमान शून्याखाली जाऊ शकते. म्हणूनच याला ‘थंड वाळवंट’ म्हटले जाते.

  • 23 Sep 2026 09:12 AM (IST)

    23 Sep 2026 09:12 AM (IST)

    Weather update: मुंबई, पुणे, रत्नागिरीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता

    पुणे : गेल्या काही दिवसांपासून बदलत्या वातावरणाचा सामना नागरिकांना करावा लागत होता. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. त्यातच आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून आता दिलासा मिळत आहे. राज्यात परतीच्या पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी काही ठिकाणी हजेरी लावत आहेत. परंतु सर्वदूर पावसाची सरी हजेरी लावत नाहीत. त्यामुळे अनेक भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पुणे, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे.

Maharashtra to World Breaking News : 

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा हा वाद गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडे हे चिन्ह आहे.  राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज विविध भागांचा आढावा घेणार आहेत.

इस्रो (ISRO) आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) यांनी २०२३ ते २०३२ पर्यंतची आपली अंतराळ सहकार्य भागीदारी नूतनीकरण केली आहे. हरियाणा आणि झारखंडसह काही राज्यांमध्ये स्थानिक सण व हुतात्मा दिनानिमित्त २३ सप्टेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा १४७ धावांनी पराभव करत आशियाई खेळ २०२६ मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व विदर्भ आणि कोकणासह राज्यातील २० राज्यांमध्ये हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.

Web Title: Maharashtra india world breaking news 23 september 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • crime news
  • Maharashta Breaking News
  • Maharashtra Politics
  • national news
  • Sports News

संबंधित बातम्या

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार
1

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
2

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल
3

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?
4

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.