
amit satam on dia mirza controversy
मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून सुरू झालेला वाद अद्याप शांत झालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर टिप्पणी करत भाजप नेत्यांच्या वक्तव्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसंच, दिया मिर्झाचा हटवलेला व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश दिले होते. आता भाजप आमदार अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Dia Mirza Controversy)
दिया मिर्झाच्या व्हिडीओवर आक्षेप का घेतला, याबाबत बोलताना अमित साटम म्हणाले की, भारतामध्ये अराजकता पसरवणाऱ्यांबाबत सहानुभूती व्यक्त करणाऱ्या काही लोकांच्या भूमिकेवर आमचा आक्षेप होता आणि यापुढेही राहील. मात्र, कोणाच्याही जाती, धर्म किंवा भाषेवरून आमचा आक्षेप नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तसंच, भारतविरोधी भूमिका घेणाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांबाबत सहानुभूती व्यक्त करण्यापूर्वी विचार करायला हवा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
मुंबई महानगरपालिकेने दिया मिर्झाचा व्हिडीओ आधी पोस्ट केला आणि नंतर हटवला. याबाबत विचारलं असता साटम म्हणाले की, महापालिकेला वाटलं म्हणून त्यांनी व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यांनाच वाटलं म्हणून डिलीट केला. याबाबतचं स्पष्टीकरण प्रशासनच देऊ शकतं. सोशल मीडिया हँडल चालवणाऱ्यांनाच पोस्ट टाकण्याचा आणि हटवण्याचा अधिकार असतो.
यापुढे महापालिका किंवा इतर संस्थांनी कोणत्या व्यक्तींशी जोडून घेत आहोत, कोणाची मदत घेत आहोत आणि कोणाला मदत करत आहोत, याचा आधी अभ्यास करावा. योग्य विचार करून निर्णय घेतल्यास अशा घटना टाळता येतील, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या निरीक्षणांबाबत बोलताना, न्यायालयाने कोणत्या संदर्भात टिप्पणी केली आहे, याचा आम्ही नक्कीच अभ्यास करू, असं साटम यांनी सांगितलं.
दरम्यान, सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडू नयेत, या न्यायालयाच्या निर्देशांबाबत जनजागृती करण्यासाठी BMC ने दिया मिर्झाचा व्हिडीओ तयार केला होता. मात्र, अमित साटम यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा व्हिडीओ हटवण्यात आला होता.
आता हायकोर्टाच्या निर्देशानंतर हा व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे अमित साटम यांच्या ताज्या प्रतिक्रियेनंतर हा वाद कोणतं वळण घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Ans: अमित साटम यांनी स्पष्ट केलं की, त्यांचा आक्षेप कोणाच्याही जात, धर्म किंवा भाषेवर नसून भारतविरोधी भूमिका घेणाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींच्या भूमिकेवर आहे.
Ans: अमित साटम यांनी व्हिडीओवर आक्षेप घेतल्यानंतर BMC ने तो सोशल मीडिया अकाउंटवरून हटवला. मात्र, व्हिडीओ हटवण्यामागचं अधिकृत कारण प्रशासनच स्पष्ट करू शकतं, असं साटम यांनी म्हटलं.
Ans: मुंबई उच्च न्यायालयाने BMC ला हटवलेला दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर अपलोड करण्याचे निर्देश दिले.