
fadnavis react to Bombay HC dia mirza controversy
Dia Mirza Controversy : दिवाळी जवळ आली असून देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईत मात्र दिवाळी सणावरून भलताच वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री दिया मिर्झा यांचा दिवाळीत फटाके न फोडण्याचं आवाहन करणारा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओवरून भाजप नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. याबाबत आता मुंबई हायकोर्टाने महत्वाचे निर्देश दिले असून मुंबई महापालिका आणि भाजप नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे.
यावरूनच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली असून दिया मिर्झा कुणी देशातील मोठ्या नेत्या नसून हा प्रश्न छोटा असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत अभिनेत्री दिया मिर्झा आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासह काही प्रसिद्ध व्यक्तींचा सहभाग होता.
याच मोहिमेअंतर्गत दिया मिर्झाने दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच नागरिकांना फटाके न फोडण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, भाजप नेते अमित साटम यांनी या व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली. ‘दिवाळी कशी साजरी करायची, हे शिकवण्यासाठी दिया मिर्झाची गरज नाही,’ असं म्हणत त्यांनी आक्षेप घेतला.
यानंतर BMC ने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवला. त्यामुळे सोशल मीडियावरही चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला.
या प्रकरणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने भाजप नेत्यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याचं अधोरेखित केलं. तसंच, सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडू नयेत, याबाबत जनजागृती करण्यासाठी BMC ने हा व्हिडीओ तयार केला होता. त्यामुळे हटवलेला व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
दरम्यान, या संपूर्ण वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “न्यायालयाने भाजप नेत्यांना फटकारलं असं आपल्याला वाटत नाही. मुळात हे प्रकरण न्यायालयात गेलंच नाही. व्हिडीओ हटवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेचा होता.”
“दिया मिर्झा या देशातील मोठ्या नेत्या नाहीत आणि हा मुद्दा इतका छोटा आहे की, तो आमच्या पातळीवरील प्रश्न नाही,” असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
एकीकडे प्रदूषणाचा प्रश्न आणि दुसरीकडे धार्मिक भावना, अशा दोन्ही बाजूंनी हा विषय चर्चेत आला आहे. त्यामुळे दिया मिर्झाचा हा व्हिडीओ पुन्हा पोस्ट झाल्यानंतर सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Ans: दिया मिर्झाने दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच नागरिकांना प्रदूषण टाळण्यासाठी फटाके न फोडण्याचं आवाहन केलं होतं.
Ans: मुंबई हायकोर्टाने BMC ला हटवलेला दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे निर्देश दिले.
Ans: देवेंद्र फडणवीस यांनी हा छोटा मुद्दा असल्याचं सांगितलं. तसेच, व्हिडीओ हटवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.