
Digvijaya Singh social media post,
दिग्विजय सिंह यांची सोशल मीडिया पोस्ट काँग्रेस नेतृत्वाला ही अप्रत्यक्ष ताकीद आहे का? असा महत्त्वाचा प्रश्न या पोस्टमधून उपस्थित होत आहे. तसेच पक्षात तळागाळातील कार्यकर्त्यांची कमतरता असल्याचे दिग्विजय सिंहांकडून काँग्रेस नेतृत्वाला सुचवले आहेत का? हा प्रश्न आता काँग्रेससह संपूर्ण राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, दिग्विजय सिंह यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनाही टॅग केले आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण आणखीच तापले आहे.
Mumbai Local : मुंबईकरांनो, 28 डिसेंबरला रेल्वेच्या ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस (Congress) कोअर किमिटीच्या बैठकीपूर्वीच ही पोस्ट केली होती. त्यानंतर ते स्वत: बैठकीला उपस्थित होते या वस्तुस्थितीमुळे या पोस्टचे महत्त्व आणखी वाढले आहे. नेमके याच वेळेला दिग्विजय सिंह यांनी केलेल्या पोस्टमुळे अधिक महत्त्वाचा बनला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच म्हणजे, १९ डिसेंबर रोजी, दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींना एका पोस्टमध्ये थेट संदेश पाठवला होता, “काँग्रेसकडे लक्ष द्या. आपल्याला व्यावहारिक विकेंद्रीकरण दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. मला आशा आहे की तुम्ही ते कराल, परंतु ते समजणे सोपे नाही.” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये, दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस पक्षातील संघटनात्मक सुधारणांच्या गरजेकडेही लक्ष वेधले. राहुल गांधींना टॅग करत त्यांनी म्हटले की, सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांबद्दल राहुल गांधींची (Rahul Gandhi) समज पूर्णपणे अचूक आहे आणि त्यासाठी त्यांना पूर्ण गुण मिळण्यास पात्र आहे. पण आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संघटनेकडे समान लक्ष देण्याची वेळ आली आहे.
दिग्विजय सिंह यांनी लिहिले की, ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाला सुधारणांची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षातही संरचनात्मक बदल आवश्यक आहेत. तुम्ही “संघटना निर्मिती” निश्चितच सुरू केली आहे, परंतु पक्ष अधिक व्यावहारिक आणि विकेंद्रित पद्धतीने चालवला पाहिजे. राहुल गांधी हे करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या या पोस्टबद्दल विचारले असता, दिग्विजय सिंह यांनी थेट “मी संघटनेचा समर्थक आहे. मी संघाचा आणि मोदीजींचा कट्टर विरोधक आहे. मी फक्त संघटनेचे कौतुक केले आहे.” असे उत्तर दिले.