अमित शहा उद्या नाशिक दौऱ्यावर; नाराज छगन भुजबळांच्या भूमिककडे असणार लक्ष्य
मुंबई : आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी पक्षांच्या शिबिराचे आयोजन केले आहे. शिर्डीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये नाराज नेते छगन भुजबळ हे सहभागी झाले होते. मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीला मान देऊन अगदी काही काळ भुजबळ हे सहभागी झाले होते. मात्र त्यानंतर छगन भुजबळ यांनी मुंबईतील एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्षांतर्गत काही बदल झाले पाहिजे, असे सुचवले आहे.
शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात पक्षांतर्गत बदल झाले पाहिजेत, अशी भूमिका अनेक नेत्यांनी व्यक्त केली. या भूमिकेबाबत छगन भुजबळांना आज विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, “माझं मत असं आहे की जे काम करू शकत नाहीत, जे कार्यरत नाहीत, असे लोक सापडले तर बदल झाला पाहिजे. पक्षाचं पार्लिमेंटरी बोर्ड तयार झालं पाहिजे. यात महत्त्वाचे निर्णय म्हणजेच आमदार आणि खासदारांच्या उमेदवारीचे निर्णय घेतले गेले पाहिजेत. जिल्हावार समित्या तयार झाल्या पाहिजेत. जिल्हा परिषद आणि महानगर पालिकेच्या निवडणुका आहेत. या समित्यांमध्ये वेगवेगळ्या समाजातील लोक असतील. या समित्यांकडून योग्य प्रकारे निवड केली जाईल. या गोष्टी असणं आवश्यक आहेत. सामूहिक निर्णय घेतले पाहिजेत.” असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
शिर्डीतील अधिवेशनात हजेरी लावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले, “शिबिराचे नावच अजितपर्व ठेवले आहे, यावरून काय ते कळून घ्या, पक्षात एकाधिकारशाही झाली आहे. मी स्पष्ट बोलतो त्याची शिक्षा मला मिळाली. सु नील तटकरे यांनी शिबिराला येण्याचा आग्रह केल्याने मी शिबिराला आलो आहे. मी ठाकरेंच्या शिवसेनेतही होतो, तेथेही एकाधिकारशाही होती. मात्र तेथे ११ जणांचे मत विचारात घेतले जायचे. शरद पवारांच्या पक्षातही मी होतो. ते निश्चितच यांच्यापेक्षा मोठे नेते आहेत. तिथे सगळ्यांची मते जाणून घेतल्यानंतरच निर्णय घेतला जायचा. काँग्रेसमध्ये तर संसदीय समितीच निर्णय घेते. आमच्या पक्षात कुणाचाच विचार घेतला जात नसल्याची नाराजी व्यक्त केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महायुतीमध्ये संधी न मिळालेल्या नाराज नेत्यांचा अक्षरशः पूर आला आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न मिळाल्यामुळे अनेक नेते नाराज आहेत. यामध्ये छगन भुजबळ यांच्या नाराजीची जोरदार चर्चा झाली. छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली होती. यामुळे ते राष्ट्रवादी सोडणार असल्याची देखील चर्चा होती. यानंतर राष्ट्रवादीच्या पक्षाच्या शिबिरामध्ये देखील त्यांच्या उपस्थितीबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या शब्दांचा मान राखून काही काळ उपस्थिती लावली होती. यावेळी ते अजित पवारांसमोर देखील आले होते. मात्र दोघांमध्ये कोणताही संवाद झालेला नाही. यामुळे छगन भुजबळ व अजित पवार यांच्यामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.