Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधान परिषदेतील जागांवरून महायुतीत वादाची ठिणगी; भाजपचे संख्याबळ कितीही असले तरी…

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तालुकानिहाय बैठका घेतल्या जात असून, या मोहिमेचे नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे करत असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 22, 2026 | 01:41 PM
Maharashtra Assembly, UD Secretary Notice, Mumbai BMC Discussion,

Maharashtra Assembly, UD Secretary Notice, Mumbai BMC Discussion,

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद जागेवर भाजपने दावा केल्याच्या चर्चावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनीही या जागेवर दावा केला आहे. ही जागा पूर्वीपासून शिवसेनेची आहे आणि पुढेही शिवसेनेचीच राहील. भाजपचे संख्याबळ कितीही असले तरी ही जागा आम्ही सोडणार नाही, असे ठामपणे त्यांनी सांगितले.

संजय शिरसाट म्हणाले, शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तालुकानिहाय बैठका घेतल्या जात असून, या मोहिमेचे नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे करत असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी सुरू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला असून, त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजितदादांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही आमदार आणि नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत असतानाच शिरसाट यांच्या दाव्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

नाशिकमधील जागेवरही दावा

विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीवरून महायुतीमधील अंतर्गत वाद आणि रस्सीखेच चव्हाट्यावर आली आहे. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असलेल्या या जागेवर आता भाजपने अधिकृतपणे दावा ठोकला आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने ही जागा आम्हालाच मिळावी, अशी आक्रमक मागणी आहे.

शिवसेना शिंदे गटात आधीच अंतर्गत स्पर्धा

सध्या ही जागा शिंदेसेनेच्या ताब्यात असल्याने या जागेवर पुन्हा आपलाच उमेदवार असावा, यासाठी शिंदेसेनेचे स्थानिक नेते आग्रही आहेत. पक्षात उमेदवारीसाठी एकापेक्षा जास्त इच्छुक असल्याने आधीच पक्षात अंतर्गत स्पर्धा सुरू होती. त्यात आता भाजपने १९० जागांच्या संख्याबळाचा हवाला देत थेट दावा केल्यामुळे शिंदेसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ठाणे-पुणे भाजप सोडणार?

जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना ठाणे आणि पुणे हा कळीचा मुद्दा ठरत आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपचे संख्याबळ आहे. तर येथे मित्रपक्षांनी दावा ठोकला आहे. ठाण्याची जागा एकनाथ शिंदे यांना पाहिजे पण तिथे भाजपचे संख्याबळ जास्त आहे. पुण्याची जागा सुनेत्रा पवार यांना पाहिजे पण तिथे भाजपचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे ठाणे आणि पुणे जागा भाजप सोडणार असल्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

तमिळनाडूमध्ये राजकीय भूकंप? ‘विजय’ यांचे सरकार कधीही कोसळणार; एम. के. स्टॅलिन यांचा मध्यावधी निवडणुकांचा दावा

Web Title: Dispute between mahayuti sub party over legislative council election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • Maharashtra Legislative Council
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Pune Visit: राहुल गांधीं आज पुणे दौऱ्यावर; तरुणांशी साधणार संवाद,दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क
1

Rahul Gandhi Pune Visit: राहुल गांधीं आज पुणे दौऱ्यावर; तरुणांशी साधणार संवाद,दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क

Maharashtra Breaking News Today 2026:  NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर
2

Maharashtra Breaking News Today 2026: NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?
3

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण
4

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.