Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुख्यमंत्री फडणवीस सर्वात खोटारडी व्यक्ती, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, वेगळा विदर्भावरही खोटेपणाचा कळस’ – हर्षवर्धन सपकाळ

जळगावातील कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटी आश्वासने, आरक्षणाचे प्रश्न, समृद्धी महामार्गातील कथित भ्रष्टाचार आणि मुंबईतील पावसाळी दुर्घटनांवरून गंभीर आरोप करत सरकारवर निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Jul 08, 2026 | 06:28 PM
Harshvardhan Sapkal

Harshvardhan Sapkal

Follow Us
Follow Us:

भाजपा महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून कंत्राटदार, ठेकेदार यांच्या माध्यमातून केवळ कमीशन खाण्याचे उद्योग सुरु आहेत. समृद्धी महामार्गात २० हजार कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे व तोच पैसा राजकीय पक्ष फोडण्यासाठी वापरला. या भ्रष्ट सरकारने त्यांच्या काळातील सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुकराव चौधरी यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते जळगाव येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते, सपकाळ पुढे म्हणाले की, “मुंबई व परिसरात सहा दिवसात मुसळधार पाऊस पडून मोठे नुकसान झाले आहे. स्कूल बसवर झाड पडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. एक व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला असून इतर घटनांमध्ये १२ पेक्षा जास्त व्यक्तींचा जीव गेला आहे, जनजीवनही विस्कळीत झाले हे सर्व भाजपा महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे बळी आहेत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे,” याचा पुनरुच्चार सपकाळ यांनी केला.

‘चीनने अरुणाचल प्रदेशातील भारताची जमीन बळकावली,’ प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मोदी सरकारला थेट सवाल

“फडणवीसांचे विधान म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या एका विधानावर विचारलेल्या प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “नाशिकमध्ये ढगफुटी होणार, असे जाहीर करून शाळा, महाविद्यालयांना देवेंद्र फडणवीस यांच्याच सरकारने सुट्टी जाहीर केली होती, पण ती केवळ अफवा होती, नाशिक व पंचक्रोशीत ढगफुटी तर झालीच नाही, फक्त काँग्रेसचे आंदोलन होऊ नये यासाठी त्यांनी अफवा पसरवली होती. आता ते माझे नाव न घेता मीच खोटा आहे असे म्हणत असतील तर त्यांचे विधान म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, असेच म्हणावे लागले.”

“देवेंद्र फडणवीस हे धादांत खोटे बोलतात”

“देवेंद्र फडणवीस हे धादांत खोटे बोलतात. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अजित पवार यांच्या पक्षाशी युती करणार नाही. सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देऊ, मराठा समाजाला फडणवीसच आरक्षण देऊ शकतो, अशा वल्गणा त्यांनी केल्या पण त्यातील काहीच केले नाही. लाडक्या बहिणांनाही २५०० रुपये देण्याची थाप त्यांनी मारली, त्यामुळे खोटे कोण बोलत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही,” असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

‘हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले’; मिसिंग लिंकवरील टीकेला फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार

“भाजपाला काँग्रेसच चोख उत्तर देऊ शकते”

शरद पवार यांच्या पक्षाच्या विलिनिकरणावर बोलताना सपकाळ म्हणाले की, “अशा उलट सुलट चर्चा सुरु आहेत पण माझ्याकडे त्याबद्दल काही माहिती नाही. त्यांचा पक्ष इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. भाजपा विरोधात लढणाऱ्यांनी एकत्र आले पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. देशात काँग्रेस व भाजपा दोनच प्रमुख पक्ष आहेत आणि भाजपाला काँग्रेसच चोख उत्तर देऊ शकते,” असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Harshvardhan sapkal criticizes devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • Maharashtra Politics
  • Mumbai Pune Missing Link

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा
1

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा

पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
2

पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
4

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.