Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: पुणे आणि साताऱ्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’

Maharashtra Breaking News : विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची ओळख, कागदपत्रांची पडताळणी निश्चित करण्यासाठी नियमावलीत आवश्यक बदल करण्यात येत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 08, 2026 | 11:25 AM
LIVE
Get the fastest Marathi news live updates, breaking news, and latest stories from Maharashtra, India

Get the fastest Marathi news live updates, breaking news, and latest stories from Maharashtra, India

Follow Us
Follow Us:
  • 08 Jul 2026 11:30 AM (IST)

    08 Jul 2026 11:30 AM (IST)

    नवा टास्क इव्हेंट लाईव्ह; मोफत अनलॉक करा एक्सक्लुझिव्ह रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स

    फ्री फायर मॅक्समध्ये 9 व्या वर्धापनदिनाचा उत्साह अजूनही सुरुच आहे. हा उत्साह आणखी वाढवण्यासाठी आता गेममध्ये एक खास ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा एक बॅटल इन युनिसन ईव्हेंट आहे. यामध्ये प्लेअर्सना टास्क पूर्ण केल्यानंतर विविध गेमिंग रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये ट्रॉफीपासून वेपन लूट क्रेटपर्यंत विविध रिवॉर्ड्सची यादी समाविष्ट आहे. याचा वापर प्लेअर्स गेममध्ये शत्रूंवर विजय मिळवू शकतात. बॅटल इन यूनिसन ईव्हेंटमध्ये तुम्ही केवळ प्रीमियम वेपन स्किनच नाही तर एक्सक्लूसिव ट्रॉफी आणि डिस्क होवर स्काईबोर्ड देखील अनलॉक करू शकतात.

  • 08 Jul 2026 11:25 AM (IST)

    08 Jul 2026 11:25 AM (IST)

    साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले

    सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे घरासमोरील उघड्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर महावितरणच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • 08 Jul 2026 11:20 AM (IST)

    08 Jul 2026 11:20 AM (IST)

    सरकारने अखेर घोषणा केलीच ! ‘या’ वाहनांना नाही द्यावा लागणार आता टोल

    दरवर्षी पालखी सोहळा आयोजित केला जातो. सरकारकडून वारकऱ्यांसाठी अनेक दिलासादायक निर्णय घेतले जातात. त्यातच आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार ६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या व परतणाऱ्या मानाच्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना टोलमाफी लागू राहणार आहे. तसेच एसटी महामंडळाच्या टोलमाफी नसलेल्या बसेसलाही या कालावधीत टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

  • 08 Jul 2026 11:10 AM (IST)

    08 Jul 2026 11:10 AM (IST)

    होर्मुझ तणाव चिघळला! तीन जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले; अनेक लष्करी तळांना लक्ष्य

    अमेरिका इराणमध्ये पुन्हा तणाव वाढण्याची शक्यात निर्माण झाली आहे. होर्मुझमध्ये तीन व्यापारी जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणवर लष्करी कारवाई केली आहे. यामुळे मध्यूपर्वेत वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 08 Jul 2026 11:00 AM (IST)

    08 Jul 2026 11:00 AM (IST)

    हृदयद्रावक घटना! खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला; मदतीला गेलेले दोघेही बुडाले

    जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये एका सेल्फीच्या मोहाने तीन निरागस मुलांचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. खदानीतील बेटासारख्या उंचवट्यावर सेल्फी काढताना एका मुलाचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आणखी दोन मित्रांनी हात दिला, मात्र तिघेही ३० फूट खोल पाण्यात बुडाले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • 08 Jul 2026 10:50 AM (IST)

    08 Jul 2026 10:50 AM (IST)

    राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता डोमिसाईल नसेल तर लायसन्स नाहीच, 1 ऑगस्टपासून

    राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी यापुढे महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करण्यात आले आहे. याचा अर्थ, जे मूळ महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, त्यांनाच आता बाईक-टॅक्सी चालवता येईल. याशिवाय, बाईक-टॅक्सी चालवणाऱ्यांना मराठी भाषा येणेही बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात वाढलेली अनधिकृत वाहतूक, महिलांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न आणि परप्रांतीय चालकांचा वाढता सहभाग या सर्व गंभीर बाबींची दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत राज्य सरकारची ही नवीन नियमावली आणि भूमिका स्पष्ट केली.

  • 08 Jul 2026 10:40 AM (IST)

    08 Jul 2026 10:40 AM (IST)

    १८० कोटींची जमीन अवघ्या १ रुपयात? पुण्यात उभारल्या जाणाऱ्या आयआयएमच्या नव्या

    देशातील आघाडीच्या व्यवस्थापन संस्थांपैकी एक असलेल्या आयआयएम नागपूरने (IIM Nagpur) आपल्या विस्ताराच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. संस्थेने पुढील ५ वर्षांसाठी एक नवीन रणनीती तयार केली असून, त्याअंतर्गत भारतासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला प्रभाव मजबूत करण्याची योजना आखली आहे. या रणनीतीचा पहिला मोठा टप्पा म्हणून पुण्यात ७० एकरांवर नवीन कॅम्पस उभारण्यात येणार आहे.

  • 08 Jul 2026 10:30 AM (IST)

    08 Jul 2026 10:30 AM (IST)

    होर्मुझमध्ये तणाव वाढला! सलग तीन व्यापारी जहाजांना लक्ष्य;

    ओमानच्या आखाताजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. कतारहून भारताकडे निघालेल्या एका LNG जहाजावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या जहाजावरील २९ कर्मचाऱ्यांपैकी चार भारतीय असून सर्वजण सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

  • 08 Jul 2026 10:20 AM (IST)

    08 Jul 2026 10:20 AM (IST)

    मध्य रेल्वेचा वेग मंदावला; गाड्या 10-15 मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

    मुंबई – ठाण्यासह उपनगर परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता रेल्वे गाड्यांवर देखील होत असल्याते पाहायला मिळत आहे. आज सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज पहाटेपासूनच ठाणे परिसरात हलक्या ते मध्य स्वरुपाचा पाऊस सुरु झाला आहे. सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे आता मध्य रेल्वेचा खोळंबा झाला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरु आहे.

  • 08 Jul 2026 10:10 AM (IST)

    08 Jul 2026 10:10 AM (IST)

    Pune Satara Orange Alert: पुणे आणि साताऱ्याला आज 'ऑरेंज अलर्ट'

    IMD Weather Forecast: महाराष्ट्रात सलग पाचव्या दिवशीही पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या सततच्या मुसळधार पावसामुळे विविध जिल्ह्यांमध्ये शेतीसह मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील २४ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा 'ऑरेंज अलर्ट' (Orange Alert) जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा

    भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या घाट क्षेत्रासाठी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला असून, डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा किंवा रस्ते खचण्याचा धोका लक्षात घेता पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • 08 Jul 2026 10:10 AM (IST)

    08 Jul 2026 10:10 AM (IST)

    देशातील विविध भागांत पावसाचा हाहा:कार; अनेक ठिकाणी भूस्खलन तर काही ठिकाणी

    गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळे जनजीवनही विस्कळीत होत आहे. असे असताना आता वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. यात ३ जणांचा मृत्यू झाला असून, ८ जण जखमी झाले आहेत. इतर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे वृत्त आहे. हा अपघात कल्लाडी येथील मीनाक्षी पुलाजवळ घडला, जिथे मलप्पुरम-वायनाड बोगदा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे.

  • 08 Jul 2026 09:55 AM (IST)

    08 Jul 2026 09:55 AM (IST)

    Palghar Monsoon Alert: पालघर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, अतिवृष्टीचा इशारा

    Palghar Monsoon Alert: पालघर जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून 'येलो अलर्ट' देण्यात आला असला, तरी सकाळपासूनच जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून, वरुणराजाने पालघरला अक्षरशः झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर केली आहे.

    हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात आज काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवत सतर्कतेचा इशारा दिला आहे. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असून, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, स्वतःची काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • 08 Jul 2026 09:50 AM (IST)

    08 Jul 2026 09:50 AM (IST)

    Ahilyanagar News: भीमा नदीला महापूर; श्रीगोंद्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला

    श्रीगोंदा,अहिल्यानगर: पुणे जिल्ह्यात आणि भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्याने श्रीगोंदा तालुक्यातील ‘आर्वी बेट’ या गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. यामुळे या बेटाचा मुख्य भूमीशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला असून येथील सुमारे २०० लोकांची वस्ती पुराच्या पाण्यात अडकली आहे.

Maharashtra to National And International Breaking News:

राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी यापुढे महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करण्यात आले आहे. याचा अर्थ, जे मूळ महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, त्यांनाच आता बाईक-टॅक्सी चालवता येईल. याशिवाय, बाईक-टॅक्सी चालवणाऱ्यांना मराठी भाषा येणेही बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात वाढलेली अनधिकृत वाहतूक, महिलांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न आणि परप्रांतीय चालकांचा वाढता सहभाग या सर्व गंभीर बाबींची दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत राज्य सरकारची ही नवीन नियमावली आणि भूमिका स्पष्ट केली.

विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची ओळख, कागदपत्रांची पडताळणी निश्चित करण्यासाठी नियमावलीत आवश्यक बदल करण्यात येत आहेत.

Web Title: 8 july 2026 live breaking news marathi maharashtra politics national politics sports maharashtra monsoon flood alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: सस्पेन्स संपला! शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येणार की नाही? देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगूनच टाकलं
1

Maharashtra Politics: सस्पेन्स संपला! शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येणार की नाही? देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगूनच टाकलं

‘मिसिंग लिंक’च्या निकृष्ट कामावरून रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, राम मंदिर घोटाळ्याची न्यायिक चौकशी करण्याची मागणी
2

‘मिसिंग लिंक’च्या निकृष्ट कामावरून रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, राम मंदिर घोटाळ्याची न्यायिक चौकशी करण्याची मागणी

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
3

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?  राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भाजप नेत्यासोबत गुप्त बैठक
4

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भाजप नेत्यासोबत गुप्त बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.