Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrikant Shinde : ‘ऑपरेशन टायगर’चे मास्टरमाइंड डॉ. श्रीकांत शिंदे? उबाठाला खिंडार पाडण्यात रणनीती ठरली निर्णायक

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 'ऑपरेशन टायगर'चे पडद्यामागील रणनीतीकार म्हणून उबाठा गटातील नाराज खासदारांना शिवसेनेकडे वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा केला जात आहे. विधान परिषदेत बेरजेचे राजकारण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 24, 2026 | 01:18 PM
Gen Z वर राजकीय पक्षांचा फोकस वाढला; फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे साधणार तरुणांशी संवाद

Gen Z वर राजकीय पक्षांचा फोकस वाढला; फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे साधणार तरुणांशी संवाद

Follow Us
Follow Us:
  • ‘ऑपरेशन टायगर’चे मास्टरमाइंड डॉ. श्रीकांत शिंदे?
  • उबाठाला खिंडार पाडण्यात रणनीती ठरली निर्णायक
  • संसदीय राजकारणातील अभ्यासू आणि युवा नेतृत्व
Shrikant Shinde Strategy News Marathi : शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे गेल्या काही वर्षांत राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात प्रभावी युवा नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत. शिवसेनेच्या संघटनात्मक विस्तारापासून संसदीय राजकारणातील भूमिका आणि ‘ऑपरेशन टायगर 2.0’सारख्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांचे नाव चर्चेत आहे.

‘ऑपरेशन टायगर’चे पडद्यामागील सूत्रधार?

शिवसेनेकडून करण्यात येणाऱ्या दाव्यानुसार, उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नाराज खासदारांना शिवसेनेत आणण्यासाठी राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या रणनीतीमागे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची महत्त्वाची भूमिका होती. गेल्या वर्षभरात त्यांनी संसदीय आणि संघटनात्मक पातळीवर आवश्यक डावपेच आखून योग्य वेळी ही मोहीम यशस्वी केल्याचा दावा केला जात आहे.

पक्षाच्या मते, सर्वपक्षीय खासदारांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध, दिल्लीतील राजकीय वर्तुळात असलेली ओळख आणि संसदीय नियमांची जाण यामुळे हे ऑपरेशन शक्य झाले. शिवसेनेतील २०२२ मधील बंडानंतर ‘ऑपरेशन टायगर 2.0’ हा पक्षासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे सांगितले जात आहे.

‘ऑपरेशन टायगर फत्ते; चौकार नाही, थेट षटकार, २०२९ साली सहाच्या सहा खासदार पुन्हा निवडून येणार,’ एकनाथ शिंदेंची ग्वाही

संसदीय राजकारणातील अभ्यासू आणि युवा नेतृत्व

डॉ. श्रीकांत शिंदे हे उच्चशिक्षित, अभ्यासू आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात. कल्याण लोकसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांच्या नेतृत्वावर मतदारांनी वेळोवेळी विश्वास दाखवला आहे. सांसद म्हणून त्यांनी रेल्वे, मेट्रो, महामार्ग आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. राम मंदिर, कलम ३७० आणि वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संसदेत शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

विधान परिषदेत ‘बेरजेच्या राजकारणा’ची रणनीती

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे संख्याबळ वाढवण्यासाठी ‘बेरजेच्या राजकारणा’वर भर देण्यात आला. नाशिकचे अपक्ष आमदार गोकुळ गिते यांना विधान परिषदेतील सहयोगी सदस्य म्हणून जोडण्यात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर आउटरिच’ अंतर्गत सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. या शिष्टमंडळाने आफ्रिकेतील चार देशांचा दौरा केला. या दौऱ्यात विविध राजनैतिक बैठका, चर्चासत्रे आणि व्याख्यानांमधून त्यांचे नेतृत्वगुण अधोरेखित झाल्याचे सांगितले जाते.

‘चांदा ते बांदा’ शिवसेना विस्तारात भूमिका

संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यभर ‘शिवसंवाद’ आणि ‘जनसंवाद’ दौरे केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष संघटनेत नवे चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या म्हणण्यानुसार, ठाणे, कल्याण, पालघर आणि इतर भागांतील निवडणूक रणनीती आखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच राज्यातील १०३ विधानसभा मतदारसंघांत सभा आणि बैठका घेत पक्ष विस्तारासाठी काम केले. शिवसेनेकडून करण्यात येणाऱ्या या दाव्यांनुसार, डॉ. श्रीकांत शिंदे हे केवळ खासदार म्हणूनच नव्हे, तर संघटक, रणनीतीकार आणि युवा नेतृत्व म्हणूनही पक्षाच्या राजकारणातील महत्त्वाचे केंद्रबिंदू बनले आहेत.

Operation Tiger : ‘या’ दोन फुटीर खासदारांना लागणार थेट केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी, मुंबईतील व्हायबी सेंटरमधून होणार मोठी घोषणा

Web Title: Dr shrikant shinde operation tiger strategist shiv sena expansion and national politics news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Operation Tiger
  • Shiv Sena
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Sunil Prabhu Car Accident: ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; विलेपार्लेत अपघात, एक जण जखमी
1

Sunil Prabhu Car Accident: ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; विलेपार्लेत अपघात, एक जण जखमी

Shiv Sena Split : पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आल्यामुळेच फूट पडली ; शिवसेनेच्या वतीने नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
2

Shiv Sena Split : पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आल्यामुळेच फूट पडली ; शिवसेनेच्या वतीने नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.