Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर

Maharashtra MLC Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रासोबतच बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील द्विवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. या घोषणेमुळे राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची चाचपणी आणि मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 22, 2026 | 11:49 AM
Maharashtra MLC Election 2026, ECI Election Schedule Maharashtra

Maharashtra MLC Election 2026, ECI Election Schedule Maharashtra

Follow Us
Follow Us:

Maharashtra MLC Election 2026 Schedule Announced : राज्यात पुन्हा एकदा  निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील पाच विधानपरिषदेच्या जागेच्या निवडणुकीची घोषणा केली.  यसाठी निवडणूक आयोगाने (ECI) आज (२२ सप्टेंबर)  बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमधील द्विवार्षिक निवडणुकांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील  अमरावती, पुणे , नागपूर, औरंगाबाद या विभागांचा समावेश असून येत्या 23 ऑक्टोबर 2026 रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होमार आहे.  तर  27 ऑक्टोबरला याची मतमोजणी होईल.  

विधानपरिषदेतील रिक्त होणार्‍या जागांवर निवडणुका होणार  आहेत. शिक्षक आणि पदवीधर  निवडणुकीसाठी 29 सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल, तर  23 ऑक्टोबर रोजी या जागांसाठी मतदान पार पडेल,  तर 27 ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. निवडणूक आयोगाने  पाच जागांवर निवडणूक जाहीर केल्यानंतर आता  राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वेगवान हालचाली सुरू होणार आहेत.

मोठी बातमी ! आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाला नाशिकमध्ये अपघात; दोन वाहनांमध्ये झाली धडक

असा आहे निवडणूक कार्यक्रम

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असेल. ७ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल, तर ९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल.

त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार असल्याचे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

महाराष्ट्रातून कोणत्या जागा रिक्त होणार?

एकूण जागा: ५ (३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघ)
सेवानिवृत्तीची तारीख: ६ डिसेंबर, २०२६
प्रमुख सदस्य आणि मतदारसंघ:
चव्हाण सतीश भानुदासराव (औरंगाबाद विभाग पदवीधर)
अरुण गणपती लाड (पुणे विभाग पदवीधर)
अभिजीत गोविंदराव वंजारी (नागपूर विभाग पदवीधर)
सरनाईक किरण रामराव (अमरावती विभाग शिक्षक)
जयंत दिनकर आसगावकर (पुणे विभाग शिक्षक)

Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी

राज्य विधानपरिषदेतील या पाचही आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांमधील हालचाली वाढू लागतील. त्यामुळे यंदाच कोणत्या जागेवर कोणाला संधी मिळणार, याकडेही सर्वांचे  लक्ष लागले आहे.

गेल्या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदरसंघातून  राष्ट्रवादी काँग्रेसचे अरूण लाड यांना उमदेवारी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. तर शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत आसगावकर यांचा विजय झाला होता.  पण भाजप उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यामुळे यावेळी भाजप कोणते डाव टाकणार, कोणत्या उमेदवारा मैदानात उतरवणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Eci announces maharashtra legislative council election schedule for 5 seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • election commission of india
  • Maharashtra Politics
  • MLC Election

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार
2

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
3

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
4

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.