Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Merger : सिल्व्हर ओकवर मोठ्या घडामोडी! जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुखांसह पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, विलीनीकरण होणार?

NCP Merger : शरद पवार रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे यांच्यासह पार्थ पवारही दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 07, 2026 | 09:10 PM
Sharad Pawar

Sharad Pawar

Follow Us
Follow Us:
  • सिल्व्हर ओकवर राजकीय हालचालींना वेग
  • जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे शरद पवारांच्या भेटीला
  • पार्थ पवारांच्या एन्ट्रीने राजकीय चर्चांना उधाण
 

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्या घरी परतताच राजकीय भेटीगाठींना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील बड्या नेत्यांसह अजित पवार गटातील पार्थ पवारही भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. (NCP Merger)

आधीच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांची राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाबाबत भाष्य केल्यानंतर या चर्चाना अजूनच जोर आला. तसेच, प्रफुल्ल पटेल यांनीदेखील शरद पवारांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतल्यामुळेदेखील याबाबत बोलले जात होते.

आता दोन्ही राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांनी सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नवा भूकंप होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Devendra Fadnavis on NCP Merger : राष्ट्रवादी विलीनीकरण चर्चांवर फडणवीसांचं मोठं विधान! आता मोठ्या घडामोडी घडणार?

शरद पवारांच्या भेटीसाठी बडे नेते सिल्व्हर ओकवर

शरद पवार सिल्व्हर ओकवर पोहोचल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या भेटीसाठी धाव घेतली. यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे.
या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा आधीपासूनच चर्चेत असल्याने या भेटींकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जात आहे.

पार्थ पवारांच्या एन्ट्रीने चर्चांना उधाण

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवारही सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.

पार्थ पवारांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. मात्र, या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

प्रफुल्ल पटेलांच्या भेटीनंतर विलीनीकरणाची चर्चा

काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान 10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करण्याचा उल्लेख झाल्याने विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली.

त्यातच सुनील तटकरे यांनी अजित पवार हयात असते तर 12 फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण झालं असतं, असं विधान केलं होतं.

आता पार्थ पवारांच्या सिल्व्हर ओकवरील भेटीमुळे या चर्चांना आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दिशेने काही हालचाली सुरू आहेत का, याचं उत्तर आगामी घडामोडींमधूनच स्पष्ट होणार आहे.

‘तटकरे खोटे आणि कपटी माणूस’, अजितदादांच्या निधनानंतर आमदारांना फोन केले? महेंद्र थोरवेंच्या दाव्याने राजकारणात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते कुठे गेले?

    Ans: शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते मुंबईतील त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले.

  • Que: शरद पवारांच्या भेटीसाठी कोणते नेते सिल्व्हर ओकवर दाखल झाले?

    Ans: जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. पार्थ पवारही भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती आहे.

  • Que: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुनील तटकरे काय म्हणाले होते?

    Ans: अजित पवार हयात असते तर 12 फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलीनीकरण झालं असतं, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं.

Web Title: Ncp merger sharad pawar silver oak parth pawar political developments vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • NCP News
  • NCP Party
  • NCP Sharad Pawar
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on NCP Merger : राष्ट्रवादी विलीनीकरण चर्चांवर फडणवीसांचं मोठं विधान! आता मोठ्या घडामोडी घडणार?
1

Devendra Fadnavis on NCP Merger : राष्ट्रवादी विलीनीकरण चर्चांवर फडणवीसांचं मोठं विधान! आता मोठ्या घडामोडी घडणार?

‘तटकरे खोटे आणि कपटी माणूस’, अजितदादांच्या निधनानंतर आमदारांना फोन केले? महेंद्र थोरवेंच्या दाव्याने राजकारणात खळबळ
2

‘तटकरे खोटे आणि कपटी माणूस’, अजितदादांच्या निधनानंतर आमदारांना फोन केले? महेंद्र थोरवेंच्या दाव्याने राजकारणात खळबळ

NCP Politics: रुग्णालयातील भेटीगाठींचा राजकीय सस्पेन्स! वेळ घेऊनही सुनेत्रा पवारांची भेट का टळली?
3

NCP Politics: रुग्णालयातील भेटीगाठींचा राजकीय सस्पेन्स! वेळ घेऊनही सुनेत्रा पवारांची भेट का टळली?

‘…तर मग आमचे पक्ष का फोडले?’; खासदार संजय राऊत यांचा सवाल
4

‘…तर मग आमचे पक्ष का फोडले?’; खासदार संजय राऊत यांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.