Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’ एकनाथ शिंदेंचा शब्द, कर्जवसुली करणाऱ्यांना दिला सज्जड दम

Eknath Shinde : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं आश्वासन दिलं आहे. यासोबतच 5 हजार रुपयांच्या तातडीच्या मदतीबाबतही त्यांनी माहिती दिली.

  • By विवेक
Updated On: Oct 27, 2026 | 04:55 PM
Eknath shinde

Eknath shinde

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम; एकनाथ शिंदेंचं आश्वासन
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 ऑक्टोबरला केंद्राला प्रस्ताव
  • मायक्रोफायनान्स कंपन्यांना सक्तीची कर्जवसुली न करण्याचा इशारा
 

Eknath Shinde : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यात मोठी गंभीर परिस्थिती उभी राहिली आहे. पावसाच्या अभावामुळे पाण्याचा मोठा तुटवडा आतापासूनच जाणवू लागला आहे. शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून नापिकीमुळे शेतकरी बांधवाना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अश्यातच कर्जबाजारीपणामुळे हैराण असलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागल्याच्या घटना राज्यात घडल्या आहे.

यावरूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे भाष्य केले आहे. ‘दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार ठाम उभं असून शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,’ असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. आज (मंगळवार, 27 ऑकटोबर) झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी संवाद साधत होते.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार आहे. राज्य सरकार 31 ऑक्टोबरला केंद्राला प्रस्ताव पाठवणार आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी सक्तीची वसुली करु नये. कर्जवसुलीचा तगादा लावणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करणार. सावकार, फायनान्स कंपनी कोणाचीही गय केली जाणार नाही.”

Cabinet Meeting Decision: १.५ कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये,  महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

‘पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले असून चारा लागवडीसाठी हमीभाव जाहीर करणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच, शेतकऱ्याला नडणाऱ्याला सोडणार नाही,’ असा गंभीर इशारा देखील त्यांनी दिला. शेतकऱ्यांना तातडीची 5 हजार रुपये मदत जाहीर झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खर्गेंच्या मोदींवरील वक्तव्याचा केला निषेध

मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील केलेल्या वक्तव्याचा एकनाथ शिंदे यांनी यावेळी निषेध केला. तसेच, ‘खर्गेंना पक्षातून काढून टाका,’ असे म्हणत त्यांनी काँग्रेसला देखील इशारा दिला. ते म्हणाले, “खर्गेंना पक्षातून काढून टाका. हा नेपाळ, बांगलादेश नाही तर नवा भारत आहे. खर्गेंच्या मोदींवरील वक्तव्याचा निषेध आहे. मोदी देश जोडणारे आहेत तर विरोधक देश तोडणारे आहेत.”

एकीकडे शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा आणि दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप, यामुळे शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत दोन्ही विषय चर्चेत राहिले. आता शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचं रूपांतर प्रत्यक्ष मदतीत कधी होतं, याकडे राज्यातील शेतकरी डोळे लावून बसले आहेत.

Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीत वादाची ठिणगी? शिंदे गटाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी काय आश्वासन दिलं?

    Ans: एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असं आश्वासन दिलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं.

  • Que: सक्तीची कर्जवसुली करणाऱ्या कंपन्यांबाबत शिंदे काय म्हणाले?

    Ans: मायक्रोफायनान्स कंपन्या आणि सावकारांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नये, असं शिंदे यांनी बजावलं. सक्तीची वसुली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

  • Que: शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची मदत कधी मिळणार?

    Ans: एकनाथ शिंदे यांनी 5 हजार रुपयांच्या तातडीच्या मदतीबाबत घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्ष वितरणाची तारीख, पात्रता आणि अर्जप्रक्रिया यांचा अधिकृत तपशील उपलब्ध नाही.

Web Title: Eknath shinde farmers drought loan recovery warning vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • drought news
  • Eknath Sinde
  • Maharashtra Drought 2026
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Shalarth ID Scam : अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात; पगार रोखण्यासह मान्यता रद्द करण्याच्या हालचाली
1

Shalarth ID Scam : अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात; पगार रोखण्यासह मान्यता रद्द करण्याच्या हालचाली

Maharashtra Drought: देवाक काळजी रे! ‘या’ जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई; तातडीने पाण्याचे…
2

Maharashtra Drought: देवाक काळजी रे! ‘या’ जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई; तातडीने पाण्याचे…

Manoj Jarange Audio Clip Row : 500 कोटींच्या क्लिपची SIT चौकशी होणार, शैलेश बलकवडे यांच्याकडे मोठी जबाबदारी
3

Manoj Jarange Audio Clip Row : 500 कोटींच्या क्लिपची SIT चौकशी होणार, शैलेश बलकवडे यांच्याकडे मोठी जबाबदारी

Prakash Ambedkar : ‘शेतकरीच नालायक आहे, 10-12 पुढाऱ्यांना मारा अन मग मरा..,’ प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने वातावरण खवळलं
4

Prakash Ambedkar : ‘शेतकरीच नालायक आहे, 10-12 पुढाऱ्यांना मारा अन मग मरा..,’ प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने वातावरण खवळलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.