Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Raj Thackeray: निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.  विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. असे असतानाच निवडणूक आयोगाच्या विरोधात आज दुपारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. 

  • By anuradha sagar
Updated On: Sep 29, 2026 | 03:44 PM
Raj Thackeray, Uddhav Thackeray, Election Commission, Mumbai Protest

Raj Thackeray, Uddhav Thackeray, Election Commission, Mumbai Protest

Follow Us
Follow Us:
  • येत्या ४ ऑक्टोबरला मुंबईत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात निघणार विराट मोर्चा
  • भायखळा (क्रुडास कंपनी गेट) ते मुंबई महापालिका असा सकाळी ११ वाजता निघणार मोर्चा
  • मोर्च्यात राजकीय पक्षाच्या झेंड्यांना मनाई; सर्वांच्या हातात फक्त ‘तिरंगा’ असणार
Protest Against Election Commission:  निवडणूक आयोगाच्या विरोधात येत्या ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा निघणार आहे. भायखळ्यातूल क्रुडास कंपंनीच्या गेटपासून मुंबई महापालिकेपर्यंत हा मोर्चा निघेल. मोर्चा महापालिकेसमोर पोहचल्यानंतर तिथे सभा होईल. सकाळी ११ वाजल्यापासून या मोर्चाला सुरुवात होईल निवडणूक आयोगाच्या विरोधातील हा मोर्चा असल्याने या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी हा मोर्चा असल्याने हातात फक्त तिरंगा झेंडा असावा,” अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभार

निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.  विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. असे असतानाच निवडणूक आयोगाच्या विरोधात आज दुपारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.  मुंबईत येत्या  ४ ऑक्टोबरला मनसे आणि ठाकरे सेनेच्या वतीने निवडणूक आयोगाविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली.

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

राज ठाकरे म्हणाले की, मी २०१७ मध्ये ईव्हीएमविरोधात भूमिका घेऊन मी अनेक नेत्यांची भेट घेतली होती. यावर आम्ही ४ तारखेच्या मोर्च्यात बोलूच पण, हा मोर्चा कोणत्या राजकीय पक्षाविरोधात नाही. गेल्या काही वर्षांत निवडणूक आयोगाकडून जो काही गैरकारभार सुरू आहे, त्याविरोधात हा मोर्चा असणार आहे. त्यामुळे सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावं,” असंही राज ठाकरे म्हणाले.

४ तारखेच्या मोर्चानंतर पुढच्या रुपरेषेबाबत आम्ही नंतर ठरवू

तसेच ४ तारखेच्या मोर्चानंतर पुढच्या रुपरेषेबाबत आम्ही नंतर ठरवू. पण ४ तारखेच्या मोर्चासाठी आम्ही सर्वच राजकीय पक्षांना यासाठी आमंत्रण देणार आहोत. हा मोर्चा कुठल्या राजकीय पक्षाविरोधात नाही. निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधातला हा मोर्चा आहे. लोक रस्त्यावर येतील तेव्हा निवडणूक आयोगाला समजेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला .

खाई त्याला खवखवे

निवडणूक आयोगावर होणाऱ्या आरोपांना भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात आहे, असे विचारले असता, “खाई त्याला खवखवे आम्ही निवडणूक आयोगावर बोलतोय, त्याचा भाजपाला त्रास का होतोय?” असा खोचक टोलाही राज ठाकरे यांनी भाजपाला लगावला.

Simple OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात बंद! 190 किमी रेंजसह आलेली स्कूटर आता मार्केटमधून गायब; जाणून घ्या

निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि मतदार याद्यांमधील कथित गोंधळावर जोरदार निशाणा साधत उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्याकडे केवळ राजकीय जय-पराजयाच्या चौकटीतून न पाहण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी ३० सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ (INDIA) आघाडीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार असून, निवडणूक आयोगाविरोधात राष्ट्रीय स्तरावर पुढील रणनीती काय असावी यावर सविस्तर मंथन होणार आहे. तत्पूर्वी, ‘शिवतीर्थ’ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ठाकरे बंधूंनी एकत्र येत ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भायखळा ते बीएमसी मुख्यालयादरम्यान भव्य संयुक्त महामोर्चा काढण्याची मोठी घोषणा केल्याने राजकीय वातावरण तापले असून, या मोर्चाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Election commission protest march mumbai october 4 raj thackeray uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Election Commission
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
1

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

SIR प्रक्रियेचा मुद्दा तापला; रायगड काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
2

SIR प्रक्रियेचा मुद्दा तापला; रायगड काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Gunratna Sadavarte : ‘राज ठाकरेंचं पितळ उघडं करणार’, 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
3

Gunratna Sadavarte : ‘राज ठाकरेंचं पितळ उघडं करणार’, 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल

Election Commission Controversy : निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या बडतर्फीसाठी होणार राज्यभर आंदोलन
4

Election Commission Controversy : निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या बडतर्फीसाठी होणार राज्यभर आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.