Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News : अध्यक्ष-सभापती निवडी 20 मार्चपूर्वीच; ग्रामविकास विभागाचे आदेश

जिल्हा परिषदेतील बहुमताचा स्पष्ट कौल नसल्याने सत्तेचा पेच अधिकच गडद झाला आहे. भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनाही स्वतंत्रपणे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आकडे गाठता आलेले नाहीत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 26, 2026 | 07:51 AM
Sangli News : अध्यक्ष-सभापती निवडी 20 मार्चपूर्वीच; ग्रामविकास विभागाचे आदेश

Sangli News : अध्यक्ष-सभापती निवडी 20 मार्चपूर्वीच; ग्रामविकास विभागाचे आदेश

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल ९ फेब्रुवारीला जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापती निवडीबाबतची उत्सुकता अखेर संपुष्टात येणार आहे. ग्रामविकास विभागाने स्पष्ट आदेश देत २० मार्च २०२६ पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींची निवड करून पहिली बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, निवड प्रक्रियेचा अधिकृत कार्यक्रम जिल्हाधिकारी लवकरच जाहीर करणार आहेत.

७ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल ९ फेब्रुवारीला जाहीर झाला; मात्र, पंधरा दिवस उलटूनही सत्तास्थापनेबाबत अनिश्चितता होती. जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व विविध विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी कोणती समीकरणे जुळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील कलम ११(१) आणि ५९(१) नुसार सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिली बैठक घेणे बंधनकारक असून, त्याच बैठकीपासून सदस्यांचा कार्यकाळ सुरू होतो. याच अनुषंगाने ग्रामविकास विभागाचे अवर सचिव बा. म. आसोले यांनी सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना २० मार्चपूर्वी पहिल्या बैठका आयोजित करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेतील बहुमताचा स्पष्ट कौल नसल्याने सत्तेचा पेच अधिकच गडद झाला आहे. भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनाही स्वतंत्रपणे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आकडे गाठता आलेले नाहीत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच अन्य लहान पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

राजकीय हालचालींना अधिकच वेग येण्याची शक्यता

आगामी निवड कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना अधिकच वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बहुमतासाठी ३१ जागांची आवश्यकता असून, कोणत्या आघाडीचे गणित जुळते यावर जिल्हा परिषदेच्या सत्तेचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, २० मार्चपूर्वीच सत्तेचे चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल (एकूण ६१ जागा)

– राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – १८
– भाजप – १६
– काँग्रेस – ११
– शिवसेना – ७
– राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ६
– शिवसेना (ठाकरे गट) – १
– जनसुराज्य पक्ष – १
– रयत क्रांती पक्ष – १

हेदेखील वाचा : धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

Web Title: Election of president and speaker before march 20 rural development department orders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 07:51 AM

Topics:  

  • sangli news
  • sangli Zp

संबंधित बातम्या

Sangli: जतमध्ये वादळी वाऱ्याचा हाहाकार; घराचे पत्रे अंगावर पडल्याने ८ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, खलाटी गावावर शोककळा
1

Sangli: जतमध्ये वादळी वाऱ्याचा हाहाकार; घराचे पत्रे अंगावर पडल्याने ८ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, खलाटी गावावर शोककळा

Sangli News : जतमध्ये यात्रेवर काळाचा घाला! भिंत कोसळून ६ भाविकांचा अंत
2

Sangli News : जतमध्ये यात्रेवर काळाचा घाला! भिंत कोसळून ६ भाविकांचा अंत

जतमध्ये यात्रेवर काळाचा घाला! वादळामुळे निवारा शेड कोसळून ६ भाविकांचा मृत्यू; मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश
3

जतमध्ये यात्रेवर काळाचा घाला! वादळामुळे निवारा शेड कोसळून ६ भाविकांचा मृत्यू; मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.