Dhananjay Munde News: बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोप वाल्मिक कराड याच्यासह धनंजय मुंडे यांच्यावरही अनेक गंभीर आरोप झाले होते. या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांनादेखील अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन आज पाच महिने उलटले असतानाही त्यांनी अद्याप शासकीय निवासस्थान असलेला ‘सातपुडा’ बंगला सोडलेला नाही, हे समोर आले आहे. त्यांनी आज राजीनामा दिल्याला पाच महिने पूर्ण होत असूनही ते अजून बंगल्यात वास्तव्यास आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव समोर आल्यानंतर मुंडे यांच्यावर राजकीय दबाव वाढला होता. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या तीव्र विरोधानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण धनंजय मुंडेंनी शासकीय बंगला रिकामा न केल्यामुळे वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना अद्याप त्या बंगल्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे प्रशासनातही संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंडे यांच्याकडील सरकारी बंगल्याच्या भाडे आणि विलंब शुल्काची रक्कम सुमारे ४२ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
Shibu Soren passes away: मोठी बातमी! झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर १५ दिवसांत सरकारी निवासस्थानी रिकामे करण्याचा नियम आहे. त्यामुळे मुंडेंना २० मार्चपर्यंत सातपुडा बंगला सोडणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही काळासाठी बंगल्याचा वापर चालू ठेवण्याची विनंती केली होती, जी मान्य करण्यात आली. पण राजीनाम्यानंतर पाच महिने उलटूनही त्यांनी बंगला सोडलेला नाही. या परिस्थितीमुळे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळांनाही बंगल्याची वाट पाहावी लागत आहे. एका माहितीनुसार, मुंडेंनी अद्याप बंगला न रिकामा केल्याने त्यांच्यावर सुमारे ४२ लाख रुपयांचा दंड प्रलंबित आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांना मुंबईतील मलबार हिल परिसरातील ‘सातपुडा’ हा उच्च श्रेणीतील सरकारी बंगला वापरासाठी मिळाला होता. मात्र, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव समोर आल्यानंतर मुंडे अडचणीत आले आणि त्यांनी ४ मार्च २०२५ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नियमानुसार, मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर १५ दिवसांत, म्हणजे २० मार्चपर्यंत, त्यांनी बंगला रिकामा करणे अपेक्षित होते.
Operation Akhal: जंगल, गुहा, डोंगर…अखलमध्ये किती दहशतवादी लपले, किती झाले ढेर
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी आता ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली. २३ मे २०२५ रोजी सातपुडा बंगला त्यांच्याकडे सोपविण्याचा शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र, बंगला अद्याप भुजबळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला नाही.
महत्त्वाचे म्हणजे, गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये मुंडे यांना बंगला रिकामा करण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून एकाही नोटीसचा अवलंब करण्यात आलेला नाही. तसेच, मुंडे यांनी देखील बंगला खाली का केला नाही, याचे कोणतेही अधिकृत कारण प्रशासनास सादर केलेले नाही.मंत्रिपद गेल्यानंतरही बंगल्यावर ठाण मांडल्यामुळे प्रशासनात नाराजी आहे, तर राजकीय वर्तुळातही या प्रकरणावरून तीव्र टीका होत आहे.