Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLC Election 2026: “कठीण पेपर संपलाय, आता फक्त…”, अमित शाहा यांच्या भेटीनंतर मुख्यमत्र्यांनी स्पष्टच सांगितलं! म्हणाले…

विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीमधील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा आता जवळपास सुटला आहे. केवळ दोन ते तीन जागांवर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 27, 2026 | 07:54 PM
अमित शाहा यांच्या भेटीनंतर मुख्यमत्र्यांनी स्पष्टच सांगितलं! म्हणाले.... (Photo Credit - X)

अमित शाहा यांच्या भेटीनंतर मुख्यमत्र्यांनी स्पष्टच सांगितलं! म्हणाले.... (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटणार!
  • विधानपरिषदेच्या १७ पैकी १२ जागांवर भाजपचा दावा
  • ‘या’ ३ जागांवरून मुंबईत होणार अंतिम फैसला
CM Devendra Fadnavis on MLC Election 2026: राज्याचे राजकीय वर्तुळ आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषदेच्या (Legislative Council) १७ जागांसाठी महायुतीमधील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा आता जवळपास सुटला आहे. केवळ दोन ते तीन जागांवर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले. नवी दिल्ली येथे केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागांवर शिवसेना (शिंदे गट), तर पुण्याच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेससोबत (अजित पवार गट) भाजपची सध्या सकारात्मक चर्चा सुरू आहे. “महायुतीचे सर्व प्रमुख नेते एकत्र बसून यावर अत्यंत सन्मानजनक तोडगा मुंबईतच काढतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

१७ जागांचा संभाव्य फॉर्म्युला

माहितीनुसार, विधानपरिषदेच्या १७ पैकी तब्बल १२ जागांवर भाजप स्वतः निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. उर्वरित ५ जागांपैकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ३ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा देण्याबाबत महायुतीत प्राथमिक चर्चा झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे प्रमुख नेते दिल्लीत होते आणि तेथे वरिष्ठ पातळीवर प्राथमिक बोलणी पूर्ण झाली आहे.

Ratnagiri News: अलोरे गावच्या इर्शाद मुल्लाजींना शिवसेनेत मोठी जबाबदारी; अल्पसंख्याक तालुकाप्रमुखपदी नियुक्ती

‘कठीण पेपर संपलाय, आता फक्त टिकमार्क बाकी!’

दिल्लीतील बैठकीनंतर विधानपरिषद निवडणुकांवर थेट भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विधानपरिषद निवडणुकीबाबत आमचं जागावाटपाचं जवळपास ‘अॅग्रीमेंट’ झालेलं आहे. फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील जागा आम्हाला मिळावी, असा भाजपचा आग्रह आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याकडे पुण्याच्या जागेची मागणी केली आहे. सध्या याच दोन-तीन जागांवरून आमच्यात चर्चा सुरू आहे, जी आम्ही लवकरच यशस्वीपणे सोडवून घेऊ. आमच्यासाठी जागावाटपाचा कठीण पेपर आता संपला असून सोपा पेपर सोडवणे सुरू आहे. फक्त अंतिम स्वाक्षरी म्हणजेच ‘टिकमार्क’ करणे बाकी आहे.”

दिल्लीत नव्हे, तर मुंबईतच सुटणार जागावाटपाचा तिढा!

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आमचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांच्यासोबत राष्ट्रीय आणि राज्याच्या विविध विकासकामांवर चर्चा होत असते. या दौऱ्यात साखर उद्योगासंदर्भातील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी आम्ही दिल्लीत आलो होतो. विधानपरिषदेत इतक्या आधी गोष्टी कधीच फायनल होत नसतात, त्या वेळेवरच होतात. त्यामुळे जागावाटपाचा अंतिम निर्णय आणि उमेदवारांची नावे थेट मुंबईतच ठरवली जातील आणि उमेदवारी अर्ज भरतानाच ती जाहीर केली जातील,” असे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिले.

Legislative Council Election : एकनाथ शिंदेंची नाराजी कायम; भाजप ठाम, शिवसेनेची मात्र कोंडी

Web Title: Following his meeting with amit shah the chief minister devendra fadnavis spoke out clearly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 07:51 PM

Topics:  

  • Amit Shah
  • CM Devedra Fadnavis
  • Rashtrawadi Congress
  • shivsena

संबंधित बातम्या

अजित पवारांच्या विमान अपघाताला ४ महिने पूर्ण; रोहित पवारांचा फडणवीस सरकारवर निशाणा, CID तपासावरही उपस्थित केले प्रश्न!
1

अजित पवारांच्या विमान अपघाताला ४ महिने पूर्ण; रोहित पवारांचा फडणवीस सरकारवर निशाणा, CID तपासावरही उपस्थित केले प्रश्न!

MLC Election 2026: महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला फायनल! भाजप ११, शिवसेना ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस २ जागा लढवणार
2

MLC Election 2026: महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला फायनल! भाजप ११, शिवसेना ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस २ जागा लढवणार

महायुतीत विधानपरिषदेचा तिढा कायम तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला, भाजपच्या १२ जागांसाठी ४८ जणांची यादी
3

महायुतीत विधानपरिषदेचा तिढा कायम तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला, भाजपच्या १२ जागांसाठी ४८ जणांची यादी

Amit Shah : अवैध घुसपैठींवर करडी नजर! अमित शहांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचे मेगा ऑपरेशन सुरू
4

Amit Shah : अवैध घुसपैठींवर करडी नजर! अमित शहांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचे मेगा ऑपरेशन सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.