Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

Shiv Sena Symbol Case : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान वकील नीरज किशन कौल यांनी पक्षांतर्गत लोकशाही आणि पक्षघटनेतील तरतुदींवर महत्त्वाचे मुद्दे मांडले. 2018 च्या पक्षघटनेनुसार पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

  • By विवेक
Updated On: Oct 08, 2026 | 05:43 PM
Real Shiv Sena Case Supreme Court, Election Commission Party Symbol Power,

Real Shiv Sena Case Supreme Court, Election Commission Party Symbol Power,

Follow Us
Follow Us:
  • 2018 च्या शिवसेना पक्षघटनेनुसार पक्षप्रमुखांना मोठे आणि अमर्याद अधिकार देण्यात आल्याचा युक्तिवाद.
  • राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यसंख्या आणि निवड प्रक्रियेवर निवडणूक आयोगाने प्रश्न उपस्थित केल्याचा दावा.
  • पक्षघटनेची आवश्यक कागदपत्रे आयोगाकडे उपलब्ध नसल्याने निर्णयप्रक्रियेत अडचणी आल्याचे सुप्रीम कोर्टात सांगण्यात आले.
 

Shiv Sena Symbol Case : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत पक्षांतर्गत लोकशाही आणि पक्षघटनेच्या मुद्द्यावर जोरदार युक्तिवाद झाला. वकील नीरज किशन कौल यांनी निवडणूक आयोगाने नोंदवलेल्या निरीक्षणांचा दाखला देत शिवसेनेच्या पक्षरचनेवर आणि निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.

कौल यांच्या युक्तिवादानुसार, 1998 मध्येच शिवसेनेला पक्षातील नेमणुका लोकशाहीच्या तत्त्वांनुसार होत नसल्याबाबत पत्राद्वारे कळवण्यात आलं होतं. त्यावर शिवसेनेकडून उत्तरही देण्यात आलं होतं. प्रत्येक राजकीय पक्षाने आपली कार्यपद्धती निश्चित करून ती पक्षघटनेत नमूद करणे आवश्यक असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याचंही त्यांनी सांगितलं.

पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार?

शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने केलेल्या निरीक्षणांचा दाखला देताना कौल यांनी पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा उपस्थित केला.

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक

त्यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेची कार्यपद्धती आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची पद्धत पाहता पक्षप्रमुखांना मोठ्या प्रमाणात अधिकार देण्यात आले होते. पक्षप्रमुख आणि पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू बनले होते, असं निरीक्षण आयोगाने नोंदवल्याचं कौल यांनी सांगितलं.

2018 च्या पक्षघटनेनुसार पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार पक्षप्रमुखांकडेच असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे पक्षातील निर्णयप्रक्रियेत इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका किती होती, हा प्रश्न उपस्थित झाल्याचंही सांगण्यात आलं.

राष्ट्रीय कार्यकारिणीवरही प्रश्नचिन्ह

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या रचनेवरही कौल यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं. कार्यकारिणीतील सदस्यांनी पक्षाच्या दैनंदिन कामकाजाची माहिती पक्षप्रमुखांना देणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी ही प्रतिनिधी सभेच्या सदस्यांकडून निवडली जाते. मात्र, ही पद्धत पक्षांतर्गत लोकशाहीच्या दृष्टीने योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

2018 च्या पक्षघटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीत 13 सदस्य असणे अपेक्षित असल्याचं कौल यांनी सांगितलं. मात्र, शेवटच्या पत्रव्यवहारात केवळ 9 सदस्यांची नावे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला.

लाखो कार्यकर्ते असलेल्या पक्षात राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यसंख्या इतकी कमी असणं आणि त्याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसणं, हा पारदर्शकतेचा मुद्दा असल्याचं निवडणूक आयोगाच्या निरीक्षणातून समोर आल्याचं कौल यांनी सांगितलं.

पक्षघटना आयोगाकडे उपलब्ध नसल्याचा मुद्दा

सुनावणीदरम्यान पक्षघटनेशी संबंधित कागदपत्रांचाही मुद्दा महत्त्वाचा ठरला. ज्या पक्षघटनेच्या आधारे पक्षाची रचना आणि कार्यपद्धती ठरवली जाते, तीच घटना निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नसल्यामुळे निर्णयप्रक्रियेवर मर्यादा आल्याचं कौल यांनी सांगितलं. राष्ट्रीय कार्यकारिणीबाबत अचूक माहिती का देण्यात आली नाही, असाही सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर विधिमंडळ पक्षातील बहुमताचा आधार घेत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला, असा युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी सुप्रीम कोर्टात केला. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादातील पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

CJP Protest 10 October: १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी अभिजीत, सौरव आणि आशुतोषच्या अडचणी वाढणार? दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय

Web Title: Shiv sena symbol case neeraj kishan kaul supreme court party constitution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • shivsena
  • Shivsena UBT
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

Taneji Sawant : अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पुन्हा एकजुटीचा संदेश
1

Taneji Sawant : अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पुन्हा एकजुटीचा संदेश

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका
2

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर शिंदे गटाचा ठाकरे गटावर थेट निशाणा
3

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर शिंदे गटाचा ठाकरे गटावर थेट निशाणा

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा
4

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.