Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रभाग क्रमांक ९ मधील पदयात्रेला म्हाळुंगेवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

म्हाळुंगे गावच्या विकास आराखड्यासाठी टोकाचे आग्रही असून, गावच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. तसेच, नागरिकांच्या मतांचा देखील यात समावेश करावा, असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 08, 2026 | 11:49 AM
प्रभाग क्रमांक ९ मधील पदयात्रेला म्हाळुंगेवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

प्रभाग क्रमांक ९ मधील पदयात्रेला म्हाळुंगेवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आज म्हाळुंगे गावांत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी म्हाळुंगेवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदयात्रेचा शुभारंभ झाला. म्हाळुंगे गावाच्या विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असून, सर्वानुमते तो लवकरच मंजूर होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रत्येक ठिकाणी भरभरुन समर्थन मिळत आहे. महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भैरवनाथांच्या आशीर्वाद घेऊन पदयात्रेला सुरुवात झाली. या रॅलीचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी भाजपचे प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, मयूरी कोकाटे, भाजपचे निवडणूक प्रमुख प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, शरद भोते, राकेश पाडाळे, विनायक चिवे, शांताराम पाडाळे, यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचा चौफेर विकास, राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गतिमान आणि सर्वसमावेशक कार्यपद्धती; मतदारांचा भरभरुन आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या बळावर भारतीय जनता पार्टीने अनेक  निवडणुकीत आजवर यश मिळवले आहे. २०१७-२०२१ काळात पुणे महापालिका क्षेत्रात अनेक प्रकल्प उभे राहिले. मेट्रो, नदीसुधार, समानपाणी पुरवठा असे एक ना अनेक प्रकल्प पूर्ण झाल्याने पुण्याचे चित्र आज बदलले आहे.

ते पुढे म्हणाले की, म्हाळुंगे गावच्या विकास आराखड्यासाठी टोकाचे आग्रही असून, गावच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. तसेच, नागरिकांच्या मतांचा देखील यात समावेश करावा, असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे सर्वानुमते हा विकास आराखडा मंजूर होईल, आणि गावचा सर्वांगीण विकास केला जाईल, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मंत्री पाटील पुढे म्हणाले की, पुणे महापालिका निवडणुकीत एकूण ४२ जणांना उमेदवारी नाकारावी लागली. पण कोणतीही तक्रार न करता, पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करत आहेत. प्रल्हाद सायकर यांच्या पत्नी स्वप्नाली सायकर विद्यमान नगरसेविका होत्या, त्यांनाही उमेदवारी देता आली नाही. पण कोणतीही तक्रार न करता स्वप्नालीताई आणि प्रल्हाद सायकर पक्षाचा आदेश मान्य करुन काम करत आहेत. याशिवाय अनेक कार्यकर्त्यांनी देखील उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती. पण नाईलाजाने त्यांनाही उमेदवारी नाकारावी लागली. ते कार्यकर्ते देखील आज भाजप उमेदवारांच्या विजयासाठी मेहनत घेत आहेत.

प्रभाग क्रमांक ९ मधून नव्या कर्तृत्ववान नेतृत्वाला संधी देण्यासाठी, एका व्यक्तीला उमेदवारी नाकारावी लागल्यानंतर, आभाळ कोसळल्याप्रमाणे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. माननीय देवेंद्रजींवरही टीका टिप्पणी करत आहेत. वास्तविक, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रहित सर्वप्रथम असते. देशाला सामर्थ्यवान, सुरक्षित, समृद्ध बनवण्यासाठी भाजपा कार्यकर्ते झटत असतात. त्यामुळे अन्य पक्षांपेक्षा भाजपा हा म्हणूनच वेगळा पक्ष आहे. तेव्हा विरोधकांना पराभवाची जाणीव झाली असल्याने आज ते टीका टिप्पणी करत आहेत. प्रभाग क्रमांक ९ मधून लहू बालवडकर हे महाराष्ट्रात विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Foot march in ward number 9 received an overwhelming response from the residents of mhalunge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • BJP Politics
  • political news
  • Pune Politics

संबंधित बातम्या

उद्यानात वॉकिंग ट्रॅक व व्यायाम साहित्य उपलब्ध करणार: बाप्पु मानकर
1

उद्यानात वॉकिंग ट्रॅक व व्यायाम साहित्य उपलब्ध करणार: बाप्पु मानकर

‘…म्हणून उद्धव ठाकरेंना सोडून काढावा लागला दुसरा पक्ष’; शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांचं मोठं विधान
2

‘…म्हणून उद्धव ठाकरेंना सोडून काढावा लागला दुसरा पक्ष’; शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांचं मोठं विधान

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा
3

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा

PCMC News: प्राधिकरणबाधित नागरिकांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड; शंकर जगतापांच्या पाठपुराव्याला मोठे यश
4

PCMC News: प्राधिकरणबाधित नागरिकांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड; शंकर जगतापांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.