
Former BJP MP Navneet Rana responded to those criticizing Ayodhya in Achalpur sabha
अमरावती जिल्ह्याच्या अचलपुर येथे आयोजित सभेत खासदार नवनीत राणा यांनी अयोध्या, धर्म, राजकारण आणि स्थानिक एकता या विषयांवर जोरदार भाषण केले. अयोध्या येथे उभारलेल्या धर्मध्वजावर पाकिस्तानकडून टीका होत असल्याचा उल्लेख करत त्यांनी देशाच्या पंतप्रधानांवर होत असलेल्या टीकेवर संताप व्यक्त केला.
माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या भाषणात धर्मध्वजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांविरुद्ध कठोर शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी सांगितले की, धर्माच्या प्रतिकांवर उंगली उठवणाऱ्यांना जनता कठोर उत्तर देईल आणि त्याविरोधात एकतेने उभे राहणे गरजेचे आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की क्षेत्रातील तीनही जागांवर कमळाचे प्रतिनिधी निवडून येणे आवश्यक आहे आणि यासाठी मतदारांनी एकसंध राहावे.
बंद दाराआड सापडल्या पैशांनी खचाखच भरलेल्या बॅगा; निलेश राणेंनी भाजप नेत्याच्या घरी टाकली धाड
यावेळी त्यांनी विकास आणि सामाजिक सलोखा टिकवण्याची गरजही नवनीत राणा यांनी मांडली. अचलपूरमध्ये एकता टिकून राहिली तर कुठलीही अस्थिरता, दगडफेक किंवा धार्मिक वैमनस्य निर्माण होणार नाही असे देखील माजी खासदार नवनीत राणा म्हणाल्या आहेत. पुढे त्या म्हणाल्या की, “अगर अचलपुर में एकता रहेगी तो न दुर्गादेवी पर पत्थर फेंके जाएंगे, न गणेश उत्सव में कोई हरा झंडा लेकर खड़ा होगा और न ही हमारी मां–बेटियों की तरफ कोई नजर उठा पाएगा,” असे माजी खासदार नवनीत राणा यांनी हिंदीमध्ये भाषण करत म्हटले.
त्याचबरोबर कार्यकर्ते आणि नागरिकांना विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. “सच्चाई और विकास के साथ खड़े कार्यकर्ता ही सबसे मजबूत होते हैं. पैसा आज आएगा, कल खत्म हो जाएगा, लेकिन एकता और सत्य हमेशा साथ रहते हैं,” असे माजी खासदार नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
श्रीलंकेत ११ दिवसांपासून मुसळधार पाऊस; पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती बिकट, अनेकांचा मृत्यू
मी पुन्हा येईल – नवनीत राणा
अमरावतीमधील धारणी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील चोथमल आणि धारणीमधील भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी तिथे माजी खासदार नवनीत राणाया देखील उपस्थित होत्या. माजी खासदार नवनीत राणा यांनी मी पुन्हा येईन, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुन्हा खासदार होण्याचा मानस व्यक्त केला. तर आमची माजी खासदार आता तुमच्या आशीर्वादाने माजी खासदार राहणार नाही, असे म्हणत नवनीत राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिलाय. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.