श्रीलंकेत ११ दिवसांपासून मुसळधार पाऊस; पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती बिकट, अनेकांचा मृत्यू
श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने गुरवारी(२७ नोव्हेंबर) दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनमुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाल आहे. तर जवळपास हजारो लोक प्रभावित झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, श्रीलंकेच्या डोंगराळ भागांमध्ये परिस्थिती बिकट असून १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कुंबक्काना येथे एक प्रवासी बस पूराच्या पाण्यात अडकली आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत २३ प्रवाशांना वाचवण्यात यश मिळाले आहे. भूस्खलनामुळे १० जण जखमी झाले आहे, तर १४ जण बेपत्ता आहेत. परिस्थिती अत्यंत बिघडत चालली आहे.
श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशायकीय जिल्ह्यांची बैठक बोलावली आहे. देशाच्या आग्नेय भागातील परिस्थिती देखील बिकट झाली आहे. ब्यूरोने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून याचे जोरदार वादळात रुपांतर हो्याची शक्यता आहे. यामुळे २०० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या वर्षी देखील श्रीलंकेत मुसळधार पावसाने कहर माजवला होता. अनेक भागात पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली होती. १,३४,००० हून अधिक लोकांवर याचा प्रभाव पडला होता. अनेक शाळा बंद करण्यात आल्या होत्या.
श्रीलंकेशिवाय इंडोनेशिया आणि व्हिएतनामध्ये देखील मान्सूनचा कहर सुरु आहे. इंडोनेशियात सुमात्रा बेटावर सततच्या पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. यामुळे अनेक जण जखमी झाले असून १० लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात विध्वंस घडला आहे.
तर दुसरीकडे व्हिएतनाममध्ये देखील निसर्गाचा कहर सुरुच आहे. गेल्या आठवड्यांपासून व्हिएतनामध्ये सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे ९० लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
इंडोनेशियात मान्सूनचा कहर! पूर आणि भूस्खलनामुळे बिकट परिस्थिती, किमान १० जणांचा मृत्यू
Ans: श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.
Ans: श्रीलंकेत पूर आणि भूस्खलनामुळे २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १४ जण बेपत्ता आहे, तर १० जण जखमी झाले आहेत.






