Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tejasvi Ghosalkar In BJP : पतीची फेसबुक लाईव्हवर हत्या अन् बदलला राजकीय मार्ग; तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश

माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला राम राम ठोकला. आज त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. यामुळे मुंबईचे राजकारण बदलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 15, 2025 | 01:30 PM
Former corporator Tejasvi Ghosalkar joins BJP leave Thackeray group mumbai Politics

Former corporator Tejasvi Ghosalkar joins BJP leave Thackeray group mumbai Politics

Follow Us
Close
Follow Us:
  • शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का
  • माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा शिवसेनेला रामराम
  • तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप पक्षप्रवेश पडला पार
Tejasvi Ghosalkar In BJP : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उद्धव ठाकरेंकडून मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र दुसरीकडे त्यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला (Thackeray Group) राम राम ठोकला. आज त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. दादरच्या वसंत स्मृतीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपचे मुंबई (Mumbai BJP) अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.

कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?

तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. फेसबुक लाईव्ह सुरु असताना अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक म्हणून तेजस्वी घोसाळकर यांनी पदभार स्वीकारला. यावेळीच त्या भाजप प्रवेश करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता.

#WATCH | Mumbai, Maharashtra: Shiv Sena (UBT) leader and former BMC Corporater Tejasvee Abhishek Ghosalkar joins BJP. She is the wife of UBT leader Abhishek Ghosalkar who was murdered in his office by one Maurice Bhai. Senior UBT leader and former MLA Vinod Ghosalkar is her… pic.twitter.com/vsQogzmGWQ — ANI (@ANI) December 15, 2025

पक्षप्रवेशापूर्वी घोसाळकर यांची भावनिक साद

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, आज आपल्याशी संवाद साधताना माझे मन प्रचंड उद्विग्न झाले आहे. आयुष्यात असा क्षण कधी येईल, आणि मला असे शब्द लिहावे लागतील, याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आज मन जड आहे… शब्द अपुरे पडत आहेत… पण तरीही हा संवाद आवश्यक आहे. मी, तेजस्वी अभिषेक घोसाळकर, एक अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी, घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आले. समाजकारण, राजकारण हे माझ्यासाठी कधीही महत्त्वाकांक्षेचे साधन नव्हते; सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी या प्रवासात पाऊल टाकले. लोकांमध्ये राहणे, त्यांची कामे करणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, यातच मला खरा आनंद मिळत गेला.

हे देखील वाचा : ‘मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत स्पष्टच सांगितले

सगळं काही छान सुरू असताना, अभिषेक व मी आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलांसाठी आणि दहिसर-बोरिवलीतील आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी अनेक स्वप्नं पाहत होतो. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं…
एका क्षणात आमच्यावर काळाचा घाला आला. अभिषेकची निघृण हत्या झाली. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्यावर आली. त्या घटनेनं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. दोन लहान लेकरं, मोडकळीस आलेलं मन, आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी, हे सगळं पेलताना मी अनेकदा कोसळले, पण पडू दिलं नाही. कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात. तो ऋणानुबंध माझ्या हृदयावर कोरला गेला आहे.
पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना, आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाहताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे तेजस्वी घोसाळकर यांनी लिहिले आहे.

पुढे त्यांनी लिहिले आहे की, अशा वेळी मला केवळ पदाची नव्हे, तर मनापासून, निर्भीडपणे आणि मोकळ्या मनाने साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे, हे मला वारंवार जाणवत आहे. मी कधीही असे म्हणणार नाही की, माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत. परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून, माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रभाग क्रमांक १ असो वा इतर भाग तसेच माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, मला एका वेगळ्या निर्णयाक पाहावे लागत आहे. तरीही एक गोष्ट मी ठामपणे सांगते, माझ्या आयुष्यातील अंधाऱ्या काळात आपण दिलेली साथ मी कधीही विसरू शकत नाही, असे तेजस्वी घोसाळकर यांनी लिहिले आहे.

हे देखील वाचा : 19 डिसेंबरला भाजपचा मराठी माणूस पंतप्रधान होणार; पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय भविष्यवाणीने उडाली खळबळ

पुढे त्यांनी मतदारांना आवाहन करत लिहिले आहे की,  मी कायम तुमच्या ऋणात राहीन. जिथे-जिथे, जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तेव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत राहीन. आजही मी तुम्हाला शब्द देते- जात-धर्म-पक्ष-विचार न पाहता, जेव्हा आपल्याला माझी गरज भासेल, तेव्हा कोणताही विचार न करता मी धावून येईन. अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या आयुष्यात एकच ध्येय उरले आहे, समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणे आणि माझ्या मुलांची व सहकाऱ्यांची काळजी घेणे.
आज आपणच माझा परिवार आहात. म्हणून बदलत्या परिस्थितीत मला घ्यावा लागणारा हा निर्णय आपण समजून घ्याल, अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. आज मी शिवसेना या माझ्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
हा निर्णय वेदनेतून घेतलेला आहे, पण माझ्या प्रामाणिकतेवर आणि आपल्या विश्वासावर कधीही ता जाऊ देणार नाही.
आपले प्रेम, आपली साथ आणि आपला आशीर्वाद मला कायम लाभो, हीच प्रार्थना, अशी अपेक्षा माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Former corporator tejasvi ghosalkar joins bjp leave thackeray group mumbai politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • Abhishek Ghosalkar Murder Case
  • political news
  • shivsena

संबंधित बातम्या

पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार?; सोमवारी घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय
1

पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार?; सोमवारी घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय

‘शिष्यवृत्ती निधी रोखणार नाही, पण…’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
2

‘शिष्यवृत्ती निधी रोखणार नाही, पण…’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Maharashtra Winter Session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप आज वाजणार; ‘हा’ मुद्दा अद्याप प्रलंबितच
3

Maharashtra Winter Session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप आज वाजणार; ‘हा’ मुद्दा अद्याप प्रलंबितच

विरोधात प्रचार केल्याचा राग अनावर; भाजप कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण
4

विरोधात प्रचार केल्याचा राग अनावर; भाजप कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.