Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गिरीश महाजन यांचा व्हायरल फोटोंवरून मोठा खुलासा, ‘ती माझ्या दिवंगत मित्राची मुलगी, तिच्या लग्नाची जबाबदारी…’

व्हायरल झालेले फोटो AI च्या मदतीने तयार केलेले बनावट असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला. संबंधित तरुणी ही दिवंगत मित्राची मुलगी असून तिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.

  • By विवेक
Updated On: Jun 21, 2026 | 04:22 PM
गिरीश महाजन यांचा व्हायरल फोटोंवरून मोठा खुलासा, 'ती माझ्या दिवंगत मित्राची मुलगी, तिच्या लग्नाची जबाबदारी...'

गिरीश महाजन यांचा व्हायरल फोटोंवरून मोठा खुलासा, 'ती माझ्या दिवंगत मित्राची मुलगी, तिच्या लग्नाची जबाबदारी...'

Follow Us
Follow Us:

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली होती. मात्र हे फोटो AI तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले बनावट फोटो असल्याचे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने स्पष्ट केल्यानंतर आता स्वतः गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना महाजन यांनी व्हायरल फोटोतील तरुणी ही त्यांच्या दिवंगत मित्राची मुलगी असल्याचे सांगितले. त्या कुटुंबाशी आपले जुने कौटुंबिक संबंध असल्याचे नमूद करत त्यांनी या प्रकरणामागे जाणीवपूर्वक बदनामीचे राजकारण होत असल्याचा आरोप केला.

काय म्हणाले गिरीश महाजन ?

यावेळी महाजन म्हणाले, “माझ्याशी संबंधित काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. या संदर्भात सत्य जनतेसमोर आणण्यासाठी मी आज खुलासा करत आहे. संबंधित मुलगी माझ्या दिवंगत मित्राची मुलगी आहे. तिचे वडील आता हयात नाहीत. आमचे त्या कुटुंबाशी कौटुंबिक संबंध आहेत. विविध कौटुंबिक कार्यक्रमांतील, गणेशोत्सवातील तसेच इतर प्रसंगांतील फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले जात आहेत.”

ओमराजेंना परत आणण्यासाठी हालचाली? संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

त्यांनी पत्रकार परिषदेत काही मूळ कौटुंबिक छायाचित्रेही दाखवली. या फोटोंमध्ये त्यांची पत्नी, मुली आणि संबंधित कुटुंबातील सदस्य एकत्र असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या फोटोंमधून इतर व्यक्तींना क्रॉप करून केवळ काही भाग सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

AI चा वापर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

गिरीश महाजन यांनी दावा केला की, काही फोटो AI तंत्रज्ञानाच्या मदतीने संपादित करून किंवा बदल करून व्हायरल करण्यात आले आहेत. “काही फोटो सेल्फी स्वरूपातील आहेत, तर काही फोटो मुद्दाम क्रॉप करण्यात आले आहेत. AI चा वापर करून चुकीची माहिती पसरवली जात आहे. अशा प्रकारामुळे संबंधित व्यक्तींच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. राजकारणात मतभेद असू शकतात, पण एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळणे योग्य नाही,” असे ते म्हणाले.

याप्रकरणी आपण सायबर सेल आणि पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून तपास यंत्रणांनी प्राथमिक पडताळणीही केली असल्याचे त्यांनी सांगितले.

“तिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर आहे”

पत्रकार परिषदेत भावनिक होत महाजन म्हणाले, “ती मुलगी माझ्या मित्राची मुलगी आहे. तिच्या वडिलांच्या निधनानंतर तिच्या कुटुंबाशी आमचे संबंध अधिक दृढ झाले. तिच्या लग्नाची जबाबदारीही माझ्यावर आहे. अशा परिस्थितीत तिच्याबाबत चुकीच्या पद्धतीने फोटो व्हायरल करून तिची आणि तिच्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे.” या प्रकारामुळे संबंधित मुलगी आणि तिच्या कुटुंबावर मानसिक ताण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून होणार सुरु; अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर होणार चर्चा

बदनामी करणाऱ्यांविरोधात न्यायालयीन लढाई

याप्रकरणी दोषींना सोडणार नसल्याचा इशारा देत महाजन यांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले. “माझी आणि एका निष्पाप कुटुंबाची बदनामी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. फोटो व्हायरल करणाऱ्या आणि त्याचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींची माहिती आमच्याकडे आहे. याप्रकरणी मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य सायबर विभागानेही संबंधित फोटो बनावट असल्याचे स्पष्ट केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आता तपास यंत्रणा या फोटोमागील सूत्रधारांचा शोध घेणार असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Girish mahajan ai fake photos girl controversy explanation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • ai
  • girish mahajan
  • viral photo

संबंधित बातम्या

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal  यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा
1

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Advertising Guidelines : ग्राहकांची दिशाभूल थांबणार! डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर; लागू होणार नवीन नियम
2

Advertising Guidelines : ग्राहकांची दिशाभूल थांबणार! डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर; लागू होणार नवीन नियम

ChatGPT वापरत असाल तर लक्ष द्या! सुरक्षेवरून मोठा वाद, OpenAI विरोधात कोर्टात धाव
3

ChatGPT वापरत असाल तर लक्ष द्या! सुरक्षेवरून मोठा वाद, OpenAI विरोधात कोर्टात धाव

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा
4

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.