Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑपरेशन ब्लु स्टार म्हणजे इतिहासातील काळा दिवस, गिरीश महाजन यांचे वादग्रस्त विधान

मंत्री गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लु स्टारच्या ४२ व्या स्मृतिदिन कार्यक्रमनिमित्त उपस्थिती लावत या दिवसाला 'काळा दिवस' म्हणून संबोधले. यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 09, 2026 | 03:26 PM
Girish Mahajan at Operation Blue star anniversary program

Girish Mahajan at Operation Blue star anniversary program

Follow Us
Follow Us:
  • ऑपरेशन ब्लु स्टार च्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त मंत्री गिरीश महाजन उपस्थित
  • ऑपरेशन ब्लु स्टार म्हणजे इतिहासातील काळा दिवस – मंत्री गिरीश महाजन
  • त्या घटनांची किंमत काँग्रेस आजही मोजत आहे – मंत्री गिरीश महाजन
ऑपरेशन ब्लु स्टार च्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त पंजाबमधील अमृतसर येथील चौक मेहता येथे शीख समुदायातील एका गटातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते. गिरीश महाजन यांची या कार्यक्रमातील उपस्थिती खळबळजनक ठरली असून गिरीश महाजन यांच्या वादग्रस्त विधानाने आता काँग्रेसच्या गोटातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ‘ऑपरेशन ब्लु स्टार म्हणजे इतिहासातील काळा दिवस असल्याचे वक्तव्य महाजन यांनी केल्याने आता देशभरातून टीका होत आहे.

शीख विभाजनवादी मृत नेता भिंद्रनवाले याचे उद्दात्तीकरण करणाऱ्या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी उपस्थिती लावली. अश्या प्रकारच्या कार्यक्रमाला राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लावणारे गिरीश महाजन हे भाजपचे पहिलेच मंत्री ठरले आहेत. या कार्यक्रमात ‘ऑपरेशन ब्लु स्टार’ च्या दिवसाला ‘काळा दिवस’ म्हणून महाजनांनी संबोधल्याने आता मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या कार्यक्रमात भिंद्रनवालेचा उल्लेख ‘शहिद’म्हणून केला गेल्याने आता अजून खळबळ उडाली आहे. अश्या कार्यक्रमात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लावल्याने गिरीश महाजन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

दमदमि टकसालच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात शीख संत, धार्मिक नेते आणि भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. व्यासपीठावर दमदमि टकसालचा माजी प्रमुख जर्नेलसिंह भिंद्रनवाले, जनरल सुभेगसिंह, शीख स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष अमरिकसिंह यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. याशिवाय ऑपरेशन ब्लु स्टारदरम्यान नुकसान झालेल्या अकाल तख्ताचे छायाचित्रदेखील लावले होते. गिरीश महाजन यांनी यावेळी ऑपरेशन ब्लु स्टारच्या फिवसाला काळा दिवस संबोधत ‘तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी सुवर्णमंदिर परिसरात सैन्य पाठवून शीख समाजावर अन्याय केल्याचे’ त्यांनी यावेळी म्हंटले.

NCP foundation day postponed: राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन एक दिवस पुढे ढकलला; काय आहे नेमकं कारण?

काय म्हणाले गिरीश महाजन?

या कार्यक्रमात उपस्थित होत महाजन म्हणाले, “ज्याप्रकारे आपले हजारो बंधू भगिनी हुतात्मा झाले आणि लष्कराने आपल्या पवित्र स्थळावर कारवाई केली, ते वेदनादायक होते. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी या पवित्र स्थळी बळजबरीने सैन्य पाठवले आणि निष्पाप लोकांना अत्यंत क्रूरपणे मारले,” असा आरोप त्यांनी केला. पुढे, त्यांनी या घटनेची तुलना अहमदशाह अब्दालीच्या आक्रमणाशी केली. ते म्हणाले, “इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशभरात झालेल्या शीखविरोधी दंगलीत हजारो लोक मारले गेले, मात्र कोणालाही शिक्षा झाली नाही. त्या घटनांची किंमत काँग्रेस आजही मोजत आहे. देशाच्या जनतेने त्यांना नाकारलेले आहे,” असे ते म्हणाले.

ममता बॅनर्जी यांना ऑफर; सोनिया गांधींनी थेट ‘या’ पदाचाच दिला प्रस्ताव?

Web Title: Girish mahajan attends operation blue star anniversary program in amritsar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 03:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.