Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Politics : अलिबाग नाही, थेट उदयपूर! महायुतीचे १२ संचालक आहेत कुठे? सतेज पाटलांनी सगळंच सांगितलं

Gokul Politics : गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षाने कोल्हापूरचं राजकारण तापलं आहे. निवडणुकीत सतेज पाटील गटाने 13 जागा जिंकत महायुतीला धक्का दिला. मात्र, सरकारने 5 स्वीकृत संचालक नेमल्याने नवा वाद पेटला आहे. त्यातच महायुतीचे 12 संचालक उदयपूरमध्ये असल्याचा दावा सतेज पाटील यांनी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 07, 2026 | 02:38 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • महायुतीचे १२ संचालक उदयपूरच्या मॅरिएट हॉटेलमध्ये?
  • सतेज पाटलांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
  • गोकुळचा सत्तासंघर्ष आता न्यायालयाच्या दारात
 

Gokul Politics : राज्याच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाचा विषय चांगलाच तापला आहे. सतेज पाटील यांच्या पॅनेलने गोकुळ निवडणुकीत बाजी मारत २५ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. महायुतीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून १२ जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे, संचालक निवडीचा पेच आणखीनच वाढला. त्यातच आता राज्य सरकारने ५ स्वीकृत संचालकांची नियुक्ती केल्याने राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.

गोकुळच्या एकूण २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलने १३ जागांवर विजय मिळवला. तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावं लागलं. आकड्यांचं गणित पाहता सतेज पाटील गटाचं पारडं जड दिसत होतं. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेला १४ सदस्यांचा कोरम पूर्ण न झाल्याने निवडीचा कार्यक्रम रखडला.

महायुतीचे संचालक थेट उदयपूरमध्ये?

दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान कोणताही राजकीय दगाफटका होऊ नये, यासाठी महायुतीच्या १२ संचालकांना सहलीवर पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. सुरुवातीला हे संचालक अलिबागमध्ये असल्याचं बोललं जात होतं. मात्र, सतेज पाटील यांनी वेगळीच माहिती समोर आणली.

NCP Politics: रुग्णालयातील भेटीगाठींचा राजकीय सस्पेन्स! वेळ घेऊनही सुनेत्रा पवारांची भेट का टळली?

एका मुलाखतीत बोलताना त्यांनी महायुतीचे संचालक गोवा, सूरत असा प्रवास करत उदयपूरला पोहोचल्याचा दावा केला. हे सर्व संचालक उदयपूरमधील मॅरिएट हॉटेलमध्ये असल्याचंही त्यांनी सांगितलं. एवढंच नाही, तर प्रत्येकाच्या रूम नंबरचीही आपल्याला माहिती असल्याचं सतेज पाटील म्हणाले. पहिल्या मजल्यावर १३० पासून रूम नंबर असल्याचा दावा करत त्यांनी राजकीय चर्चेला आणखी हवा दिली.

सरकारच्या ५ संचालकांच्या निर्णयाने नवा वाद

एकीकडे अध्यक्षपदाचा पेच कायम असतानाच राज्य सरकारने ५ स्वीकृत संचालक नेमण्याचा निर्णय घेतल्याने वादाला नवं वळण मिळालं आहे. या संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्याचा मुद्दाही चर्चेत आहे. त्यामुळे गोकुळच्या सत्तेचं गणित बदलणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सतेज पाटील यांनी या निर्णयावर आक्षेप घेत सरकारवर गोकुळचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आता या संपूर्ण प्रकरणात न्यायालय काय भूमिका घेतं आणि गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

‘…तर मग आमचे पक्ष का फोडले?’; खासदार संजय राऊत यांचा सवाल

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील गटाला किती जागा मिळाल्या?

    Ans: गोकुळच्या एकूण 25 जागांपैकी सतेज पाटील यांच्या पॅनेलने 13 जागांवर विजय मिळवला, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या.

  • Que: गोकुळ संघावर सरकारने किती स्वीकृत संचालक नेमले?

    Ans: राज्य सरकारने गोकुळ संघावर 5 स्वीकृत संचालकांची नियुक्ती केल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. त्यांच्या मतदानाच्या अधिकारावरूनही वाद निर्माण झाला आहे.

  • Que: महायुतीचे 12 संचालक कुठे असल्याचा दावा सतेज पाटील यांनी केला?

    Ans: सतेज पाटील यांच्या दाव्यानुसार, महायुतीचे 12 संचालक उदयपूरमधील मॅरिएट हॉटेलमध्ये थांबले आहेत. यापूर्वी ते अलिबागमध्ये असल्याची चर्चा होती.

Web Title: Gokul politics satej patil reveals mahayuti directors location vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Gokul
  • Gokul Milk
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Kolhapur Gokul Milk Politics: कोल्हापूर तुमच्या अहंकाराची मस्ती उतरवणार!; सतेज पाटलांकडून आंदोलनाची घोषणा
1

Kolhapur Gokul Milk Politics: कोल्हापूर तुमच्या अहंकाराची मस्ती उतरवणार!; सतेज पाटलांकडून आंदोलनाची घोषणा

Kolhapur Gokul Politics: गोकुळच्या राजकारणात नवा ट्विस्ट; गोकुळ अध्यक्षपदाची निवडीसाठी हसन मुश्रीफांची सतेज पाटलांना ऑफर
2

Kolhapur Gokul Politics: गोकुळच्या राजकारणात नवा ट्विस्ट; गोकुळ अध्यक्षपदाची निवडीसाठी हसन मुश्रीफांची सतेज पाटलांना ऑफर

Gokul Election: गोकुळमध्ये सत्ता मिळवण्यासाठी सरकारचा कायद्यात बदल; विरोधकांचा गंभीर आरोप
3

Gokul Election: गोकुळमध्ये सत्ता मिळवण्यासाठी सरकारचा कायद्यात बदल; विरोधकांचा गंभीर आरोप

Kolhapur Gokul Politics : गोकुळच्या वादात रोहित पवारांची उडी! ‘फडणवीसांचा इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड?’
4

Kolhapur Gokul Politics : गोकुळच्या वादात रोहित पवारांची उडी! ‘फडणवीसांचा इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.