Gopichand Padalkar argument with Dada Bhuse and the table president in the assembly
Gopichand Padalkar : मुंबई : विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या जोरदार चर्चेमध्ये आले आहेत. नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले गोपीचंद पडळकर हे आता त्यांच्या विधीमंडळातील वागण्यावरुन चर्चेत आले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत वाद सुरु आहेत. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये हे विधीमंडळाच्या लॉबीमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यानंतर आता आमदार गोपीचंद पडळकर यांचे सभागृहामध्ये देखील खटके उडत असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभेत गोपीचंद पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये यांच्यामध्ये देखील वाद झाले. तर दुसरीकडे लक्षवेधीवरुन शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातही वाद झाला. विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधीच्या मुद्द्यावरून हा सगळा प्रकार घडलेला आहे. लक्षवेधीच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर हे मुद्दा मांडत असतानाच तालिका अध्यक्षांसोबत त्यांचा वाद झाला. यामुळे आता गोपीचंद पडळकर यांचे सभागृहामध्ये देखील वाद होत असल्याचे दिसून आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गोपीचंद पडळकर यांनी मुद्दा उपस्थित करताना जास्त वेळ घेतल्यामुळे तालिका अध्यक्षांनी त्यांना रोखले असल्याचे दिसून आले. गोपीचंद पडळकरांनी बिंदु नामावलीचा मुद्दा उपस्थित केला. बिंदु नामवली १९७० ला पहिल्यांदा आली आणि त्यामध्ये अनेक वेळा बदल झाले जेव्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आला तेव्हा बिंदु नामवलीत बदल झाला. नंतर व्हीजेएनटी त्यात प्रवर्ग तयार केला. ९७ ला परत ती बिंदु नामवली बदलल्या. २०१८ ला मराठा आरक्षण आलं परत बिंदु नामवली बदलली परत मराठा आरक्षण रद्द झालं परत त्यात बदल झाला.’ यानंतर सभागृहाचा वेळ मर्यादित असल्याने तालिका अध्यक्षांनी पडळकरांना थांबवले. यावेळी पॉईंटेड प्रश्न कसा सांगणार? विषय कसा कळणार? जमत नसेल तर मी बोलत नाही, माझी लक्षवेधी कॅन्सल करा, असे गोपीचंद पडळकर हे तालिका अध्यक्षांना म्हटले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याचबरोबर लक्षवेधीवरुन मंत्री दादा भुसे यांच्यासोबत देखील गोपीचंद पडळकर यांचा वाद झाला. ते म्हणाले की, विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तुम्ही वास्तविक वेळेवर उपस्थित नव्हते. ही लक्षवेधी परत घ्या हे मीच सांगितलं होतं, असं दादा भुसे हे गोपीचंद पडळकर यांना म्हणाले. यावेळी ते मध्ये मध्ये बोलत असल्यामुळे दादा भुसे देखील संतापले. तुम्ही आधी ऐकून घ्या आता. तुम्ही मला ऐकू नका म्हणजे काय? मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही नव्हते तरी मी या लक्षवेधीसाठी थांबून राहिलो आहे, असे देखील दादा भुसे म्हणाले आहेत. यामुळे गोपीचंद पडळकर यांचे सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर देखील वाद होत असल्याचे दिसत आहे.