Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Happy Birthday Sharad Pawar: राष्ट्रवादी राजकारणाचा शिल्पकार! अशी आहे त्यांच्या नेतृत्वाची यशस्वी कहाणी

Sharad Pawar Birthday: बारामती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य ते 4 वेळा मुख्यमंत्रीपद... शरद पवार यांचा राजकीय प्रवास अतिशय चकित करणारा आहे. राजकारणील किंगमेकरचा राजकीय प्रवास जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 12, 2025 | 10:03 AM
Happy Birthday Sharad Pawar: राष्ट्रवादी राजकारणाचा शिल्पकार! अशी आहे त्यांच्या नेतृत्वाची यशस्वी कहाणी

Happy Birthday Sharad Pawar: राष्ट्रवादी राजकारणाचा शिल्पकार! अशी आहे त्यांच्या नेतृत्वाची यशस्वी कहाणी

Follow Us
Close
Follow Us:
  • जुलै 1978 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले
  • 1967 साली पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवड झाली
  • ‘किंगमेकर’च्या राजकीय सामर्थ्याचा प्रवास चकित करणारा
जेष्ठ नेते शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. आज महाराष्ट्रातील चौकाचौकात शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत. शरद पवार यांना नेते, कार्यकर्ते, कलाकार या सगळ्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे शरद पावर यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन दोन दिवस आधीच करण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी डिनर पार्टी झाली. यामध्ये राजकीय नेत्यांसह उद्योगपती सहभागी झाले होते. या पार्टीला विशेष उपस्थित अजित पवार यांची होती. शरद पवार यांचा राजकीय प्रवास फारच प्रेरणादायी आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची राजकीय कारकिर्द आणि बालपणातील काही गोष्टी जाणून घेऊया.

Shivraj Patil Chakurkar : देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन; 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

12 डिसेंबर अतिशय खास

12 डिसेंबर, 1940 रोजी शरद पवार यांचा जन्म झाला. विशेष गोष्ट म्हणजे शरद पवार यांच्या आईचा वाढदिवस देखील 12 डिसेंबर रोजी असतो. शरद पवार यांच्या वडीलांचे नाव गोविंद राव आहे. ते नीरा कॅनाल कोऑपरेटिव सोसाइटी (बारामती) मध्ये एक वरिष्ठ अधिकारी होते. तर शरद पवार यांची आई शारदा बाई, डाव्या विचारसरणीच्या त्या एक ज्वलंत राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या, पुणे लोकल बोर्डावर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. (फोटो सौजन्य – Pinterest)

27 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला

शरद पवारांनी वयाच्या 27 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. 1958 मध्ये शरद पवार पुण्यातील काँग्रेस भवनात गेले आणि पक्षाचे सक्रिय सदस्यत्व स्वीकारले. 1967 हे वर्ष शरद पवार यांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे ठरले. कारण 1967 साली शरद पवार पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर 1977 मधील आणीबाणीनंतर काँग्रेसचे दोन गट पडले. यावेळी शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांची साथ दिली. यावेळी वसंतदादा पाटील, शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्यासह ‘रेड्डी कॉंग्रेस’मध्ये गेले. 1978 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकदा एकत्र आले. त्यावेळी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. पण यामुळे शरद पवार काहीसे नाराज झाले होते. याच नाराजीसह शरद पवार त्यांच्या 40 समर्थकांसह पक्षातून बाहेर पडले.

असा होता मुख्यमंत्री पदाचा प्रवास

जुलै 1978 मध्ये ‘पुरोगामी लोकशाही दलाचे’ नेते म्हणून शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. वयाच्या 38 व्या वर्षी शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण सत्ता राजीव गांधी यांच्या क्राँग्रेसकडे गेली. त्यावेळी राजीव गांधींनी शरद पवारांनी क्राँग्रेसमध्ये येऊन कामं करावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. 1984 मध्ये पवार बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर शरद पवार तातडीने दिल्लीला गेले आणि त्यांनी क्राँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1988 मध्ये पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. 1990 च्या निवडणुकीनंतर शरद पवार तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद प्रकरणानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यामुळे शरद पवार पुन्हा महाराष्ट्रात आले आणि हीच त्यांच्यासाठी सुवर्णसंधी ठरली. म्हणजेच शरद पवार चौथ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

Sharad Pawar Dinner Night : पवार कुटुंबामध्ये झाले मनोमीलन? वाढदिवसाच्या Pre-Dinner मध्ये काका पुतण्या दिसले एकत्र

2023 साली शरद पावरांनी अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. पवारांनी केलेल्य़ा या घोषणेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर शरद पवारांनी आपला निर्णय मागे घेतला. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच अजित पवारांनी बंड पुकारले. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर राष्ट्रवादी विरोधी राष्ट्रवादी अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

Web Title: Happy birthday sharad pawar know about the political journey of shard pawar politics news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 10:03 AM

Topics:  

  • ajit pawar
  • NCP Sharad Pawar
  • Shard Pawar

संबंधित बातम्या

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले 44000 कोटींचे पॅकेज; अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती
1

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले 44000 कोटींचे पॅकेज; अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती

Sharad Pawar Dinner Night : पवार कुटुंबामध्ये झाले मनोमीलन? वाढदिवसाच्या Pre-Dinner मध्ये काका पुतण्या दिसले एकत्र
2

Sharad Pawar Dinner Night : पवार कुटुंबामध्ये झाले मनोमीलन? वाढदिवसाच्या Pre-Dinner मध्ये काका पुतण्या दिसले एकत्र

Baba Adhav यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
3

Baba Adhav यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

Sangli Election : सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी ताकदीने लढणार, महायुतीला प्राधान्य; पण…
4

Sangli Election : सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी ताकदीने लढणार, महायुतीला प्राधान्य; पण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.